Sushant Singh Rajput: वसईतील जूचंद्र गावच्या कलाकाराची सुशांत सिंग राजपूतला अनोखी आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:22 IST2020-06-15T15:22:01+5:302020-06-15T15:22:53+5:30
मिनारने चक्क घरातील भिंतीवर वृत्तपत्र चिटकवून (7 बाय 5 फूट) त्यावर हे चित्र साकारले असून हे चित्र साकारण्यासाठी त्याला साधरण अर्धातास लागला.

Sushant Singh Rajput: वसईतील जूचंद्र गावच्या कलाकाराची सुशांत सिंग राजपूतला अनोखी आदरांजली
आशिष राणे
वसई - पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पूर्व पट्टीत वसलेले जूचंद्र हे कलाकारांचे गाव म्हणून सुपरिचित म्हणून ओळखले जाते, या गावातील तरुण मोठ्या प्रमाणावर रांगोळीकार म्हणून ओळखले जातात यातीलच एक कलाकार असलेल्या मिनार पाटील याने रविवारी अकस्मात मृत्यू पावलेल्या अभिनेता सुशांत सिग राजपूत याला अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.
मिनारने चक्क घरातील भिंतीवर वृत्तपत्र चिटकवून (7 बाय 5 फूट) त्यावर हे चित्र साकारले असून हे चित्र साकारण्यासाठी त्याला साधरण अर्धातास लागला. या संदर्भात मिनारशी बोललो असता त्याने सांगितले की, सुशांत सिंग राजपूत हा माझा आवडता अभिनेता होता त्याने एम एस धोनी क्रिकेट जगताशी आधारित सिनेमात अफलातून काम केले होते सद्या तो तरुणांच्या गळ्यातील एक ताईतच होता त्याला माझ्या कलेच्या माध्यमातून मी आज ही आदरांजली वाहिली असल्याचे मिनारने लोकमतला सांगितले.