शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

वाढवणविरोधी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; विकासाच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:22 IST

वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामकाजाविरोधात काही स्थानिक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

लाेकमत न्यूज नेटवर्कउरण : वाढवण बंदराच्या कामकाजाविरोधात स्थानिकांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे नियोजित बंदराच्या कामाला चालना मिळाली असून विकासाच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामकाजाविरोधात काही स्थानिक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, अधिग्रहण कार्यवाही आणि इतर संबंधित पावले प्रलंबित याचिकांमध्ये पुढील आदेशांच्या अधीन राहतील. सद्य:स्थितीत वाढवण बंदराच्या विकासकामांवर कोणतीही स्थगिती नाही. त्यामुळे जेएनपीएने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या मंजूर आराखड्यानुसार प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे काम  पुढे नेण्यात येत असल्याचे वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

हा प्रकल्प प्रगतीचे प्रतीक न्यायालयाचा निर्णय भारताच्या सागरी दृष्टिकोनावर आणि विधिसंगत प्रक्रियेवरील विश्वास दृढ करणारा आहे. वाढवण बंदर प्रगतीचे प्रतीक असून पश्चिम किनाऱ्याला जागतिक व्यापाराच्या केंद्रांशी जोडणार. विकास हा स्थानिक समुदायाच्या हानीवर नव्हे, तर त्यांच्या सहकार्याने साधला जाईल, असे वाघ यांनी स्पष्ट केले. 

बंदर क्षमतेत वाढ होणारवाढवण बंदर प्रकल्पाचा उद्देश भारताच्या सागरी क्षेत्राला नव्या रूपात परिभाषित करण्याचा आहे. या प्रकल्पाद्वारे बंदर क्षमतेत वाढ होईल. प्रादेशिक विकासाला गती मिळेल आणि भारताचे स्थान जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून अधिक दृढ होईल, असा विश्वासही वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Dismisses Plea Against Wadhwan Port; Project Advances

Web Summary : The Supreme Court dismissed a petition against the Wadhwan port project, clearing the way for development. The court observed that acquisition proceedings are subject to pending orders. Wadhwan Port Project Limited confirmed project implementation will proceed according to the approved plan, boosting maritime capacity and regional growth.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय