पर्यवेक्षकांना केवळ २५ रु. मानधन
By Admin | Updated: March 24, 2017 00:54 IST2017-03-24T00:54:19+5:302017-03-24T00:54:19+5:30
महागाईच्या काळातही १० वी १२ वीच्या परिक्षांचे पर्यवेक्षण करणाऱ्यांना प्रतिपेपर फक्त २५ रू. मानधन मिळते. त्यामुळे दुरवरून

पर्यवेक्षकांना केवळ २५ रु. मानधन
कासा : महागाईच्या काळातही १० वी १२ वीच्या परिक्षांचे पर्यवेक्षण करणाऱ्यांना प्रतिपेपर फक्त २५ रू. मानधन मिळते. त्यामुळे दुरवरून येणाऱ्या शिक्षकांना प्रवास भाडयासाठी पदरमोड करण्याची वेळ येत आहे. १२ वी परिक्षेचे केंद्र डहाणू, बोर्डी, चिंचणी, आदी ठिकाणी आहे. तेथे कासा, सायवन, भागातील शिक्षकांना २५ ते ३५ कि.मी. प्रवासाठी ७० ते ८० रू. प्रवासभाडे खर्च होतो. मात्र त्यांना फक्त २५ रू. मिळतात. तसेच डहाणूतील आदिवासी भागात कासा येथे १० वीचे परिक्षा केंद्र असून परिसरातील १५ ते २० कि.मी. अंतरावरून पर्यवेक्षणासाठी येणाऱ्या शिक्षकांना ४० ते ५० रू. प्रवासभाडे लागते.
१० वीच्या तीन तासाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी परिक्षकास ४.२५ रू. अडीच तासाची उत्तर पत्रिका तपासण्यासाठी २.५० रू. मिळतात. तर १२ वी साठी ३ तासाची उत्तर पत्रिका तपासण्यासाठी ५ रू, अडीच तासाची उत्तर पत्रिका तपासण्यासाठी पावणेचार रुपये, दीड तासाची उत्तर पत्रिका तपासण्यासाठी २.५० रू तर एक तासाची उत्तर पत्रिका तपासण्यासाठी २ रू. मिळतात. प्रतिदिन साधारण २० ते २५ उत्तरपत्रिका तपासावे लागत असून एक उत्तरपत्रिका तपासणीसाठी साधारण २० मिनिट लागतात. पेपर, आदर्श उत्तर पत्रिका आणण्यासाठी आणि त्या मॉडरेटरकडे देण्यासाठी ४ ते ५ फेऱ्या माराव्या लागतात. तेही खर्चिक असते. या रक्कमेध्ये १० वर्षामध्ये वाढ झालेली नाही.(वार्ताहर)