नववीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 22, 2017 01:17 IST2017-03-22T01:17:54+5:302017-03-22T01:17:54+5:30
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याने शाळा कंपाउंड मधील आंब्याचा

नववीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
सुरेश काटे / तलासरी
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याने शाळा कंपाउंड मधील आंब्याचा झाडाला रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. नितेश रमेश भोये विक्र मगड (आंबेघर) असे त्याचे नाव असून तो समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षण घेत होता.
नामांकित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ठक्कर बाप्पा विद्यालयात दुसरी अशी गंभीर घटना घडल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. या आधी आठ महिन्यांपूर्वी शाळेच्या आवारातील स्नानगृहात दोरीने गळफास घेऊन घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु सुदैवाने काही विद्यार्थ्यांनी प्रकार पाहिल्याने त्याचा जीव वाचला होता, त्यानंतर आज घडलेल्या घटनेवरून असे निदर्शनास येते की शाळा व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाने कसला ही बोध घेतलेला नसल्याने अशा घटना शाळेच्या आवारात वारंवार घडत आहेत. येथील वसतिगृहात १०९ मुले आणि ९० मुली आदिवासी प्रकल्प विभागा अंतर्गत राहत असून समाज कल्याण विभागा मार्फत वसतिगृहात ५४ मुले व २० मुली असे एकूण २७३ विद्यार्थी निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. मात्र रात्रीच्या सुमारास महिला अधिक्षक, तसेच मुलांच्या वसतिगृहाची असलेले अधीक्षक शाळेत अनेक वेळा अनुपस्थित राहतात या शिवाय मुख्याध्यापकांचे शाळेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांवर लक्ष नसल्याने अशा या घटना घडत असल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी करून मुख्याध्यापक, अधिक्षक, सुरक्षारक्षक, शाळा संचालकां विरुद्ध गुन्हा नोंदवित नाहीत तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन न करू देण्याची भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तणाव पूर्ण झाले होते. ३० मार्च रोजी पालक व शाळा संचालक व्यवस्थापन तसेच अन्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे जाहीर केल्या नंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला .अशोक बुलकुंडे : मुख्यध्यापक : शाळेत अधीक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित असतात या व्यतिरिक्त रात्रीच्या सुमारास मी स्वता: अनेक वेळा वसतिगृह परिसरात फिरत असतो, महिला अधिक्षक पद रिक्त असल्याने मुलींच्या वस्तीगृहाजवळ सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षारक्षक ठेवलेले असतात. नितेश हा वर्गात हुशार शांत मुलगा होता असे मुख्याध्यापक बुलकुंडे यांनी सांगितले, समाज कल्याण विभाग मार्फत चालवल्या जाणाऱ्या या वस्तीगृहकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे या वस्तीगृहां चे अधिक्षक वसतिगृहात राहातच नाही अधिक्षक राजेश विल्हात राहत नसले बाबत मुख्याध्यापक यांनी त्यांना अनेक वेळा नोटीसही काढल्या तसेच कार्यालयाला कळविले पण त्याची दखल ना अधिक्षकाने घेतली ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्या या हलगर्जी चा बळी नितेश झाला (वार्ताहर)