शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
4
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
5
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
7
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
8
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
9
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
10
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
11
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
12
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
13
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
14
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
15
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
16
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
17
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
18
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
19
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
20
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत शाळांवर होणार कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:21 IST

पालघर जिल्ह्यात एकूण २९९ शाळा अनधिकृत व त्यातील ७० टक्के शाळा वसईत याबाबत लोकमतने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी घेतले असून या शाळांवर करावयाच्या कारवाईंची रुपरेखा ठरविण्यासाठी सोमवारी बैठक बोलाविली आहे.

- हितेन नाईकपालघर - जिल्ह्यात एकूण २९९ शाळा अनधिकृत व त्यातील ७० टक्के शाळा वसईत याबाबत लोकमतने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी घेतले असून या शाळांवर करावयाच्या कारवाईंची रुपरेखा ठरविण्यासाठी सोमवारी बैठक बोलाविली आहे. तिला शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. तिच्यात कारवाईचा आराखडा निश्चित होऊन मंगळवारपासून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. यामुळे अवैध शाळा चालविणाऱ्या शिक्षण माफियांचे धाबे दणाणले आहे.पालघर जिल्ह्यात १९९ शाळा या अनधिकृत असल्याचे जाहीर करुन अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दरवर्षाप्रमाणे या वर्षीही केले आहे. पालघर तालुक्यात इयत्ता पहिली ते १० वीच्या १६ शाळा, तलासरी तालुक्यातील ३ शाळा, डहाणू तालुक्यातील ३ शाळा, वाडा तालुक्यातील ९ शाळा, जव्हार तालुक्यातील १ शाळा, मोखाड्यातील ३ शाळा, विक्रमगडमधील ४ शाळा अशा फक्त ३९ शाळा तर वसई तालुक्यातील सर्वाधिक १६० शाळा असून त्यात प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मराठी , इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.या शाळांना १ लाख रुपयांचा दंड करण्याची तरतूद असली तरी तो वसूल करण्यासाठी शिक्षण विभागाकडे हेडच नसल्याचे एका अधिकाºयाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे एकीकडे या दंडापोटी सुमारे २ कोटी रु पयांचे नुकसान ही होत असून दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळही खेळला जात आहे.१६० अवैध शाळा वसई तालुक्यातपालघर जिल्ह्यात १९९ शाळा अनधिकृत असून त्यात चक्क १६० शाळा म्हणजे ७० टक्के या वसई तालुक्यात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नालासोपाºयात संतोषभुवन या परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे.स्वत:चे मैदाने व अन्य सुविधा असण्याच्या शर्र्तींची पूर्तता अनेक शाळांनी केली नसतांनाही त्यांना शिक्षण विभागाने कशाच्या आधारे परवानग्या दिल्या आहेत हे तपासल्यास भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतील.

टॅग्स :SchoolशाळाVasai Virarवसई विरार