कठोर कारवाई हवी!

By Admin | Updated: July 10, 2016 00:20 IST2016-07-10T00:20:17+5:302016-07-10T00:20:17+5:30

दैनिक लोकमतचे वाडा वार्ताहर वसंत भोईर यांना वाड्यातील काही ठेकेदारांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेचा वाडा तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध करून धमकावणाऱ्या

Strict action should be taken! | कठोर कारवाई हवी!

कठोर कारवाई हवी!

वाडा: दैनिक लोकमतचे वाडा वार्ताहर वसंत भोईर यांना वाड्यातील काही ठेकेदारांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेचा वाडा तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध करून धमकावणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी शनिवारी वाडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने वाड्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांना निवेदन देऊन तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात सध्या पत्रकारांना धमक्या देण्याचे प्रकार वाढत असून वसंत भोईर यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भोईर यांनी ई-टेंडरिंग मोडीत काढून कामे लाटण्याच्या विषयावर वृत्त प्रकाशित केले होत. यात वाड्यातील ठेकेदार लॉबीने त्यांना धमकी देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने वाड्यासह पालघर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संतापले असून धमकी देण्याविरोधी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. वाडा तालुका पत्रकार संघाने याबाबत कठोर कारवाई करा, अशी मागणी करणारे निवेदन वाडा पोलिसांना दिले असून याबाबत कडक भूमिका न घेतल्यास पत्रकार आंदोलनाचे हत्यार उपसतील, असा इशारा अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Strict action should be taken!