शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

वादळी पावसाचा भातशेतीला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:56 PM

शुक्रवारी जिल्ह्यात पाऊस : भातशेतीच्या आशा संपुष्टात; शेतकरी पुन्हा हवालदिल

पारोळ : वादळी पावसाने शुक्रवारी जोरदार हजेरी लावल्याने कापलेले भात पीक भिजले असतानाच शेतात उभे असलेले पीकही आडवे केल्याने या पावसात शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. नदी नाल्यातील पाणी वाढल्याने ते पाणीही शेतात जात भातपिकाचे मोठे नुकसान केले.

६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ‘महा’ चक्र ीवादळ धडकेल आणि या दरम्यान पाऊसही जोरदार होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. तर या दरम्यान भात कापणीची कामेही बंद ठेवण्यास प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. बुधवारी हवामानात कोणताही बदल दिसला नाही. तर गुरुवारी ऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी केली. तर तयार झालेले पीक पावसाच्या भीतीने किती दिवस शेतात ठेवायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पण शेतकºयांचा अंदाज चुकीचा ठरवत पावसाने शुक्र वारी पहाटे जोरदार हजेरी लावली. यात कापलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होत उभे असलेले उरले सुरले पीकही आडवे केले. तर या पावसात आडव्या झालेल्या पिकात पाणी घुसल्याने ते पाणी शेताबाहेर काढण्याचे नवीन आव्हान शेतकºयांपुढे उभे राहिले आहे. तर शेतात पाणी झाल्याने शेतात कापणी केलेले भातपीक उंच जागी ठेवण्यासाठी पुन्हा शेतकºयांचा मजुरीचा खर्च वाढणार आहे.

या हंगामात भातशेतीवर निसर्गाची अवकृपा राहिली. लावणीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे भात रोपे खराब झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी दुबार लागवड केली. तर भातपीक कापणीसाठी तयार झाले असताना, काही ठिकाणी कापणीही केली असताना दिवाळीआधी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पीक आणि तणाचे मोठे नुकसान केले. कापणी केलेले भातपीक पावसामुळे १० दिवस शेतात राहिल्याने तणही वाया गेल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला.ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंताग्रस्ततलासरी : परतीच्या पावसाने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असताना नवीन ‘महा’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने पावसाने आधीच भात पीक वाया गेले. चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी पहाटे जोरदार पावसाच्या सरी पडल्याने कापलेल्या पिकाचे नुकसान झाले.त्यातच दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने आता उरले सुरले पीकही वाहून नेतो की काय या चिंतेत शेतकरी आहे. चक्र ीवादळाने मुसळधार पावसाबरोबर जोरदार वादळी वाºयाची शक्यता वर्तवली होती.पण काही वेळच जोरदार सरी कोसळल्याने संभाव्य धोका टाळल्याने शेतकºयांबरोबर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. पण पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.वाडा : शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला असून भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता मात्र उरले-सुरले तेही हातून निघून गेल्याने शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे. हाती भातच येणार नसल्याने शेतीसाठी घेतलेले सेवा सहकारी सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न बळीराजाला पडला आहे. चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने भात कापण्या जोमाने सुरू झाल्या होत्या. मात्र, शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा जोरदार सरी बसू लागल्याने पूर्ण पिकच हातून निघून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण शेतात पाणीच पाणी झाल्याने संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे.

वाड्यात भात हे एकमेव पीक असून यावर येथील शेतकरी आपली उपजीविका करतात. आता तेच हातून निघून गेल्याने येथील बळीराजा संकटात सापडला असून मुला-बाळांचे शिक्षण तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सांगा, आम्ही जगायचे तरी कसे ?कासा : डहाणू तालुक्यात गुरु वारी रात्री जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. पिके पाण्यात भिजत पडल्याने आता घरी खायला पण धान्य राहणार नाही. त्यामुळे सांगा आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागातील भातशेतीचे पावसामुळे आधीच मोठे नुकसान झाले आहे. असे असताना गुरुवारी रात्री पुन्हा पावसाने तडाखा दिला. त्यामुळे शेती थोडी सुकत नाही तर पुन्हा शेते पावसाने भरून गेली आहेत. आधीच बरीच कुजलेली, रुजलेली पिके कापायलाही पावसाची उघाडी मिळत नाही. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेले पीक कापायला चार, पाच दिवसांपासून सुरु वात केली तर गुरुवारी रात्रभर पाऊस पडल्याने शेतात पुन्हा पाणी भरले आहे. शेतात चिखल झाला आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेले थोडे फार कधी कापायचे असा शेतकºयांना मोठा प्रश्न पडला असून सर्वच पीक वाया गेले. खायचे काय आणि जगायचे कसे? असा यक्ष प्रश्न शेतकºयांना पडला आहे. सतत पीक पाण्यात राहिल्याने आता पावली पण कुजली व काळी पडली आहे. त्यामुळे पाळीव गुरांच्या खाण्याचा प्रश्न पण गंभीर झाला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार