वाड्यात कापडाच्या दुकानात चोरी

By Admin | Updated: March 30, 2017 05:23 IST2017-03-30T05:23:54+5:302017-03-30T05:23:54+5:30

शहरातील खंडेश्वरी नाका येथे वाडा जनता सोसायटी या दुकानात सोमवारी कपडे घेण्याच्या बहाण्याने तीन महिला आल्या

Stolen in a clothing store in the castle | वाड्यात कापडाच्या दुकानात चोरी

वाड्यात कापडाच्या दुकानात चोरी

वाडा: शहरातील खंडेश्वरी नाका येथे वाडा जनता सोसायटी या दुकानात सोमवारी कपडे घेण्याच्या बहाण्याने तीन महिला आल्या असत्या एकीने हातचलाखी करून चार साड्या लंपास केला. मात्र ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत असतानाही पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे, खंडेश्वरी नाका येथे वाडा जनता सोसायटी नावाचे कपड्याचे दुकान आहे.
या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तीन महिला दुकानात आल्या. त्यानंतर दोन महिला साड्या पसंत करीत होत्या. यातील एक महिला साड्या चोरत होती. या महिलेने एकूण पंचवीस हजार रूपयांचा चार साड्या लंपास केल्या. या दुकानाचे मालक मयूर भेरे हे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले असता पोलीस ती नोंदवून घेतली नाही .असा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता दुकानदारच तक्र ार दाखल करण्यास चालढकल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शहरात अशा प्रकारे भुरट्या चोऱ्या करणारी टोळी आली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून सावधगिरीचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Stolen in a clothing store in the castle