शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

भिवंडीत रसायनांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:27 PM

नारपोली पोलिसांची कारवाई : २१ लाख ७५ हजार किंमत

भिवंडी : भिवंडीत बेकायदा रासायमिक गोदामांवर कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्र्यांनी देऊनही भिवंडी महसूल विभागाकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. बेकायदा रसायनांची साठवणूक करत असल्याचे प्रकार भिवंडीत वाढले आहेत. वळगाव येथील गोदामावर मंगळवारी नारपोली पोलिसांनी छापा घालून २१ लाख ७४ हजार ५४० रु पयांचे विनापरवाना २२३ ड्रम जप्त केले. या प्रकरणी गोदाम मालकासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केवळ थातूरमातूर कारवाया करून या माफियांना महसूल विभाग पाठीशी घालत असल्याचे चित्र भिवंडीत समोर येत आहे. या बेकायदा रासायनिक गोदामांना आगी लागल्याच्या घटना राजरोस घडत असतानाही महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे.प्रकाश मोहिते (३९) असे गोदाम व्यवस्थापकाचे नाव असून अरु ण उर्फतानाजी शंकर पाटील असे गोदाम मालकाचे नाव आहे. त्यांनी वळगाव येथील भामरे कम्पाउंड येथे बेकायदा रसायनांचे २१ लाख ७४ हजार ५४० रु पयांचे विनापरवाना २२३ ड्रम ठेवले होते. ही माहिती नारपोली पोलिसांना मिळताच त्यांनी या गोदामावर छापा घालून विनापरवाना रसायनांचा साठा जप्त केला.गोदाम मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपस नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक पुष्पराज सुर्वे करीत आहेत.यंत्रणांचे होत आहे दुर्लक्षच्भिवंडीत रसायनांच्या गोदामांना आगी लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना नेहमीच घडतात. त्यामुळे येथील गोदामांवर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले असूनही भिवंडीत मोठ्या प्रमाणात बेकायदा रसायनांची साठवणूक होत आहे.च्या साठ्यांवर महसूल विभागाने व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी