एसटी चालकाचा बसमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:34 IST2023-06-23T11:33:42+5:302023-06-23T11:34:29+5:30

सतीश महाले असे या ३६ वर्षीय चालकाचे नाव आहे.

ST driver's suicide attempt in bus | एसटी चालकाचा बसमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

एसटी चालकाचा बसमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

जव्हार : महामंडळाचे अधिकारी त्रास देतात म्हणून एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसमध्येच एका चालकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना जव्हारमध्ये गुरुवारी सकाळी घडली. सुदैवाने ही घटना होत असताना सुरक्षारक्षक व चालकाच्या मित्राने ते बघितले आणि तातडीने त्याला खाली घेत त्याचा जीव वाचविला. सतीश महाले असे या ३६ वर्षीय चालकाचे नाव आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करतेवेळी तेथील सुरक्षारक्षकाने आरडाओरड केली. तेथे उपस्थितांनी त्याला तत्काळ खाली उतरवले, मात्र त्याची प्रकृती खालावत असल्यामुळे त्याला कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून, आता त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती मिळाली.

आगारातील अधिकारी देत होते त्रास
सतीश महाले हे चालक असून त्यांना विविध कारणांवरून आगारातील काही अधिकारी त्रास देत होते. त्याने याबाबत तक्रारी केल्या, मात्र त्याला न्याय मिळाला नाही. म्हणून त्याने गुरुवारी डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. 

Web Title: ST driver's suicide attempt in bus

टॅग्स :palgharपालघर