तस्करांकडून साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: January 26, 2017 02:51 IST2017-01-26T02:51:32+5:302017-01-26T02:51:32+5:30

येथील मांडवी वन क्षेत्रपालांच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री वनविभागाच्या कारवाईमध्ये पाठलाग करुन पीकअप गाडीसह खैराचे

The smugglers seized a plot of three and a half lakhs | तस्करांकडून साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

तस्करांकडून साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

पारोळ, दि.२३ (वार्ताहर) : येथील मांडवी वन क्षेत्रपालांच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री वनविभागाच्या कारवाईमध्ये पाठलाग करुन पीकअप गाडीसह खैराचे ओंडके जप्त करण्यात आले. हा मुद्देमाल तील लाख रुपयांचा असल्याची माहिती वनविभागाने दिली
आहे.
मांडवी बाणगंगा रेंजमध्ये सोमवारच्या मध्यरात्री एम एच ४८ टी ३६१० या क्र मांकाची पीकअप गाडी डिम लाईट करुन रस्त्याने पळविली जात असल्याने वन अधिकाऱ्याने तिचा पाठलाग
केला. या कारवाईमध्ये मुद्देमाल जरी हाती लागला असला तरी अंधाराचा फायदा घेऊन तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणाचा पुढील तपास वनक्षेत्रपाल गावंड हे करत आहेत. या कारवाईमळे रात्रीच्या वेळी वनांमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (वार्ताहर)

Web Title: The smugglers seized a plot of three and a half lakhs