लहान पापलेटची मासेमारी; बोटींवर कारवाई, गस्ती नौकेद्वारे पिल्ले, जाळ्यांचे मोजमाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:35 IST2025-04-04T12:34:37+5:302025-04-04T12:35:04+5:30

Palghar: समुद्रात लहान पापलेटच्या पिल्लांची सुरू असलेली बेसुमार मासेमारी रोखण्यासाठी सहआयुक्त तथा अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष महेश देवरे यांना स्वतः टीमसह मंगळवारी समुद्रात उतरावे लागले. त्यांनी उत्तन, वसई कार्यक्षेत्रात गस्ती नौकेद्वारे मच्छिमारी बोटींची तपासणी केली.

Small papulet fishing; action on boats, chicks by patrol boat, measurement of nets | लहान पापलेटची मासेमारी; बोटींवर कारवाई, गस्ती नौकेद्वारे पिल्ले, जाळ्यांचे मोजमाप

लहान पापलेटची मासेमारी; बोटींवर कारवाई, गस्ती नौकेद्वारे पिल्ले, जाळ्यांचे मोजमाप

- हितेन नाईक 
पालघर - समुद्रात लहान पापलेटच्या पिल्लांची सुरू असलेली बेसुमार मासेमारी रोखण्यासाठी सहआयुक्त तथा अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष महेश देवरे यांना स्वतः टीमसह मंगळवारी समुद्रात उतरावे लागले. त्यांनी उत्तन, वसई कार्यक्षेत्रात गस्ती नौकेद्वारे मच्छिमारी बोटींची तपासणी केली. यावेळी लहान पापलेटची मासेमारी करणाऱ्या दोन बोटमालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१)अंतर्गत कारवाई करून प्रतिवेदन दाखल केले.  यावेळी बोटीतील पापलेटची पिल्ले, जाळ्यांचा आस यांचे मोजमाप केले. 

खुलासा सादर करण्याचे दिले आदेश 
लहान पापलेटच्या पिल्लांची बेसुमार मासेमारी केली जात आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून ‘ज्युव्हेनाईल ॲक्ट’ची अंमलबजावणी केली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसारित झाल्यानंतर त्याची दखल मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी घेतली. 

कोकणातील सर्व जिल्ह्यांतील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी अल्पवयीन मासेमारी व खरेदीबाबत अंमलबजावणी करून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष महेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त दिनेश पाटील यांनी बुधवारी  अल्पवयीन लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई केली. 

दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घसरण 
केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था सीएम एफआरआय यांनी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या ५८ मत्स्य प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाची शिफारस करून पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण, विनियमन आणि अल्पवयीन मासे पकडणे टाळण्याबाबत व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही काही मच्छीमार लहान आसाची जाळी वापरून अल्पवयीन मासे पकडत आहेत. त्यामुळे मत्स्य उत्पादनाचा आकडा घसरू लागल्याने बंदरांतील बोटींची संख्या अर्ध्यावर आली आहे. अनेक सहकारी संस्था कर्जबाजारी होऊन बंद पडल्या. हे रोखण्यासाठी जुव्हेनाईल ॲक्टची कारवाई गरजेची आहे. 

समुद्रात १० नॉटिकल क्षेत्रामध्ये अंमलबजावणी कक्षाकडून कारवाई करताना वसई येथील दोन बोटींवर प्रतिवेदन दाखल केले आहेत. 
- दिनेश पाटील, 
सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी पालघर.

Web Title: Small papulet fishing; action on boats, chicks by patrol boat, measurement of nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.