शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

भाजपाच्या खासदाराला शिवसेनेची उमेदवारी; पालघरमधून गावितांचे नाव निश्चित 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 2:44 AM

युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

पालघर : युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारच नव्हता, तर मतदारसंघ मागितला कशाला, असा प्रश्न शिवसैनिक उघडपणे विचारू लागले आहेत.यात सर्वाधिक कोंडी झाली आहे, ती गावित यांची. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. हा मतदारसंघ शिवसेनेला दिल्याने खासदारकीऐवजी आमदार होण्याचे त्यांचे प्रयत्न होते. पूर्वी राज्यमंत्रीपद मिळाल्याने त्यांना पुन्हा मंत्रीपदाची अपेक्षा होती. शिवसेनेकडे असलेला पालघर विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या बदल्यात मागितल्याचे सांगितलेही जात होते. त्यात ते बहुजन विकास आघाडीत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या. आता शिवसेनेतर्फे लोकसभा लढवावी लागणार असल्याने मंत्रीपदाऐवजी शिवबंधन बांधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भाजपाचा खासदार शिवसेनेतर्फे लढल्यास आणि त्याला श्रमजिवी संघटनेची साथ मिळाल्यास त्याचा फायदा होईल, असे त्रैराशिक यासाठी मांडले जात आहे. या पार्श्वभूमीवर गावित यांनी अजून काही ठरलेले नाही, एवढीच प्रतिक्रिया दिली.शिवसेनेचा उमेदवार ठरत नसल्याने बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यांच्या पक्षातर्फे बळीराम जाधव यांचेच नाव चर्चेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपाचा पाठिंबा आणि वसई, विरार, नालासोपाऱ्यावरील पकडीचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मतदारसंघ हातून गेल्याबद्दल भाजपा आणि संघ परिवारात असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.उमेदवारीची घोषणा आज होण्याची शक्यतापालघर नगरपरिषदेची निवडणूक पार पडेपर्यंत रोखून धरलेली राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी पक्षात घेतलेला चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना शिवसेनेने आमदारकीच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :palgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक