शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेने पालघरचा गड राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:08 IST

काँग्रेसचे नम पराभूत; पश्चिम पट्ट्याने तारले

- हितेन नाईकपालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातील एकूण २४ फेऱ्यांपैकी पाचव्या फेरी नंतरच शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नम यांच्यावर घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत ४० हजार १४८ मताधिक्याने विजय मिळविला. बहिष्काराच्या मुद्द्याने गाजलेल्या या मतदारसंघात नेहमीप्रमाणे पश्चिम पट्ट्याने वनगा यांना साथ दिल्याने हा सेनेचा बालेकिलल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

पालघर विधानसभेत एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत सेना महायुतीचे उमेदवार श्रीनिवास वणगा आणि काँग्रेसचे योगेश नम यांच्यात झाली. गुरुवारी सकाळी पालघरच्या स. तु. कदम या महाविद्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून १ हजार २३२ मतांनी काँग्रेसचे योगेश नम आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मिळवले असले तरी पाचव्या फेरीमध्ये श्रीनिवास वनगा यांनी ४९२ मतांनी आघाडी घेतली.

सेनेने आघाडी घेतल्याची माहिती समाजमाध्यमांवर झळकायला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी हळूहळू मतदान केंद्राबाहेर जमायला सुरूवात केली. ८ व्या फेरीमध्ये सेनेने २ हजार ६३३ मतांची आघाडी घेतल्यानंतर सेनेच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करायला सुरूवात झाली. सतत वाढत जाणारे मताधिक्य आणि ६ हजार १२८ मतांच्या आघाडीनंतर ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशाी जोरदार घोषणाबाजी होऊ लागली.

यामध्ये महिला कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांचा सहभाग मोठा होता. पश्चिम भागातील मतदान पेट्यांमधील मतांची रसद सेनेला मिळू लागल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या विजयाच्या दिशेने सुसाट निघालेल्या वारूला रोखण्याची किमया कुठलाहीउमेदवार करू शकला नाही. अखेर २४ फेºयांनंतर श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या शंकर नम यांचा ४० हजार १४८ मतांनी पराभव केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले, आणि शिवसेनेचा एकच जल्लोष सुरू झाला.

दरम्यान, वाढवण बंदर आणि डहाणू पर्यावरण प्राधिकरण हटवणे आणि केळवे पूर्व, झंजरोली, मायखोप आदी भागातील उड्डाणपूल, रस्ते, सोयीसुविधांची वानवा या विरोधात २३ गावपाड्यांनी टाकलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५० हजार मतदारांनी मतदान टाळले. यातील मतदारांचा मोठा टक्का हा सेनेचा असल्याने प्रचंड मताधिक्य प्राप्त करण्याची संधी गमावली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019palghar-acपालघरShiv Senaशिवसेना