शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शिजान खानला आज न्यायालयात आणणार; पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 09:05 IST

आतापर्यंत केलेल्या तपासात ‘लव्ह जिहाद’चा अँगल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नालासोपारा : अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रियकर शिजान खान याला उद्या वालिव पोलिस वसई न्यायालयात हजर करणार आहेत. 

तुनीषाने मालिकेच्या सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन शनिवारी दुपारी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी  प्रियकर शिजान खानला अटक केली होती. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची कोठडी उद्या संपत असल्याने त्याला वसई न्यायालयात पुन्हा हजर करणार आहे. दरम्यान, दोन किंवा तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता आहे.

‘लव्ह जिहाद’चा अँगल नाही

तुनीषा ही ‘अली बाबा’ मालिकेचा को-स्टार शिजान खानसोबत काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. ब्रेकअपनंतर तुनीषा अस्वस्थ होती. यामुळे २४ डिसेंबरला मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. आतापर्यंत केलेल्या तपासात लव्ह जिहादचे एकही प्रकरण समोर आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच शवविच्छेदन आहवालात तुनीषासोबत बळजबरीचे कोणतेही चिन्ह नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Tunisha Sharmaतुनिशा शर्माVasai Virarवसई विरार