अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: February 23, 2017 05:27 IST2017-02-23T05:27:31+5:302017-02-23T05:27:31+5:30

मैत्रीणीची अश्लिल चित्रफित बनवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या

Sexual Abuse By Showing Porn Movies | अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार

अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार

विरार : मैत्रीणीची अश्लिल चित्रफित बनवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नालासोपाऱ्यातील समीर बावडेकरला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. त्याची नालासोपारा येथे राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणीशी मैत्री झाली होती.
मैत्रीचा गैरफायदा घेत समीरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि एका मित्राच्या मदतीने अश्लिल चित्रफित बनवली. त्यानंतर तो पिडीत तरुणीला त्याआधारे ब्लॅकमेल करीत होता. तसेच तिला आणि तिच्या आईला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. याला कंटाळलेल्या त्या तरुणीने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual Abuse By Showing Porn Movies