लहरी पावसावर तोडगा; वापरा आधुनिक पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:28 PM2019-06-25T23:28:53+5:302019-06-25T23:29:09+5:30

लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते.

Settle on the rainy season; Use modern methods | लहरी पावसावर तोडगा; वापरा आधुनिक पद्धती

लहरी पावसावर तोडगा; वापरा आधुनिक पद्धती

Next

बोर्डी - लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात याबद्दलचे प्रयोग मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मागील दशकापासून मान्सूनच्या लहारीपणामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात लागवडीवर विपरीत परिणाम होत आहे. घटत्या उत्पादनामुळे शेतकरी भात पिकापासून फारकत घेत असून हे क्षेत्र घटत आहे. भात हे अधिक पावसावर घेतले जाते. मात्र पावसाचा कालावधी बदलल्याने पारंपरिक ऐवजी आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास अपेक्षित पीक घेण्याचे तंत्र कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे शिकविले जात असून त्याचा परिणाम उत्पादन वाढीत होत आहे. या पद्धतीमुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे, भाताची खणणी आणि लावणी करण्याची आवश्यकता नसल्याने मजुरी व चिखलणीकरिता केला जाणारा खर्च कमी होत आहे. शिवाय कमी कालावधीत पीक तयार होऊन अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करता येते.

कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे चार प्रकारच्या आधुनिक पद्धती अवलंबिण्याचे सुचविले जात आहे. त्यानुसार ट्रे वापरुन रोपवाटिका केल्यास एकरी केवळ ३ ते ४ किलो बियाणे लागते. तर पारंपरिक पद्धतीने एकरी १५ ते १८ किलो बियाण्याची आवश्यकता भासते. या आधुनिक पद्धतीने कमी बियाणे लागत असून मजुरीचा खर्चही वाचविता येतो. ड्रम पद्धतीने भात लागवड करण्याकरिता पावसाळ्या पूर्वी जमिनीची मशागत करण्याची आवश्यकता असून ड्रमच्या सहाय्याने भात लागवड केली जाते. याद्वारे प्रति एकरी ८ ते १० किलो बियाण्याची गरज लागते. एका दिवसात दोन मजूर दोन एकरापर्यंत लागवड करू शकतात. त्यामुळे मजुरीचे तीस दिवस वाचत असून एकरी सुमारे पाचहजार रु पये उत्पादन खर्च वाचविता येतो. महत्त्वाचे म्हणजे पीक ८ ते १० दिवस आधी तयार होते.तर टोकन पद्धतीने भात लागवड करण्याकरिता जमिनीची मशागत करून २० बाय २० सेमी अंतरावर ४ ते ५ दाणे याप्रमाणे घेऊन कंपोस्ट खताने खड्डे झाकून घ्यावे लागतात. मिरची किंवा अन्य पिकाप्रमाणेच भात सुद्धा माल्चिंग पद्धतीने घेतले जाते. पावसापूर्वी जमिनीची मशागत आवश्यक असून ४.५ फुट अंतरावर सरी पाडून १०० सेमीचा गादीवाफा तयार केला जातो. त्यावर माल्चिग पेपर अंथरून १ फूट अंतरावर छिद्र पाडून त्यामध्ये ४ ते ५ दाणे टाकून कंपोस्ट खताने झाकून घेतले जाते. या पद्धतीने मजुरीची बचत तर होतेच शिवाय ८ ते १० दिवस अगोदर पीक तयार होते. त्यानंतर रब्बी हंगामात याच बेडवर हरभरा लावता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच बेडवर दोन वर्षात भात आणि हरभरा पीक घेता येते हे विशेष. सगुणा भात तंत्रज्ञान ही सुद्धा आधुनिक भात लागवडीची आणखी पद्धती असून या भात लावडीच्या पद्धतीविषयी अधिक माहितीसाठी केंद्राशी ९८५०२६०३५५ संपर्क साधावा, अशी माहिती प्राध्यापक भरत कुशारे यांनी केले आहे.

Web Title: Settle on the rainy season; Use modern methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती