मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:13 IST2025-05-28T18:10:03+5:302025-05-28T18:13:58+5:30

Lahanu Kom Passes Away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

Senior Communist Party of India (Marxist) leader and former MP Lahanu Kom passes away | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेले १० दिवस लहानू कोम हे एका खासगी रुग्णालयात आय.सी.यू. मध्ये होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लहानू कोम यांनी खासदार आणि आमदारकीसह पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, लाखो आदिवासी मुलामुलींना गेली सहा दशके शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले होते.

लहानू कोम यांच्या पश्चात पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे.  त्यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार, दिनांक २९ मे रोजी दुपारी १२ वाजता पालघर जिल्ह्यात तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून निघेल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक नेते व कार्यकर्ते, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे अनेक नेते, आणि इतर अनेक मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी होतील.  

Web Title: Senior Communist Party of India (Marxist) leader and former MP Lahanu Kom passes away