Sena's saffron on Sagave gram panchayat | सागावे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा, ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व

सागावे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा, ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व

पालघर : तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीवर शिवसेनापुरस्कृत युवा परिवर्तन पॅनलने ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व मिळवित भगवा फडकवला. तर विरोधी युवा परिवर्तन पॅनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.

तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गावाच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक न लढविता बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्या. तरीही एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. नामनिर्देशनपत्र भरताना विरोधात एकही नामनिर्देशनपत्र न आल्याने दीपाली दिनेश राव, संदेश रवींद्र खाटाळी आणि ममता मंगेश गायकवाड हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

१५ जानेवारीला ४ जागांसाठी ८ उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनल आणि पक्षविरहित युवा परिवर्तन पॅनल या दोघांमध्ये लढत झाली. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी दोन उमेदवार विजयी करण्याचे लक्ष्य होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण आणि आमदार श्रीनिवास वणगा यांनी निवडणुकीदरम्यान व्यूहरचना आखत दोन जागा जिंकून सागावे ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले.

Web Title: Sena's saffron on Sagave gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.