शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

स्व. खासदार वनगांच्या लेटरहेडचा गैरवापर, विवेक पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:20 AM

पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा यांनी त्यांच्या मृत्यू आधी सह्या केलेल्या कोºया लेटरहेडचा दुरुपयोग काही राजकीय व्यक्ती, ठेकेदार आता करीत असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित ह्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

पालघर : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा यांनी त्यांच्या मृत्यू आधी सह्या केलेल्या कोºया लेटरहेडचा दुरुपयोग काही राजकीय व्यक्ती, ठेकेदार आता करीत असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित ह्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.ज्या व्यक्तींनी आपले पूर्ण आयुष्य वंचित घटकांना, न्याय मिळवून देण्यासाठी करताना आपल्या पदाचा, पक्षाचा वापर कधीही वैयक्तिक फायद्यासाठी केला नाही अशा नि:स्पृह, निष्कलंक व्यक्तींच्या पश्चात त्यांच्या लेटरहेडचा दुरुपयोग ठेके मिळविण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पंडित यांनी केला आहे.त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की माझी खात्रीपूर्वक माहिती अशी आहे की, नुकतेच स्वर्गवासी झालेल्या वनगा यांच्या स्वाक्षºया काही राजकीय व्यक्तींनी आणि ठेकेदारांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या कोºया लेटरहेडवर सह्या घेऊन ठेवल्या होत्या. वनगाच्या चांगल्या, कुणावरही पटकन विश्वास ठेवण्याच्या स्वभावामुळे ते असे करीत असत.त्यांच्या हयातीतही त्याचा वापर आपल्या व्यक्तिगत स्वार्थाकरता या पूर्वीही केला जात असे. आता त्यांच्या मृत्यूनंतरही त्याच लेटरहेडवर जुन्या तारखा टाकून काही ठेकेदारांनी बांधकामाची कामे देणारी शिफारस पत्रे तयार केली आहेत. आणि ती राज्यशासनाने कडे तसेच ठाणे, पालघरमधील बांधकाम खात्याच्या अभियंत्याकडे तसेच जिल्हाधिकाºयाच्या कार्यालयात दिली असल्याचे विवेक पंडित यांचे म्हणणे आहे.वनगांच्या मृत्यू नंतर आधीच्या तारखाची आलेली पत्रे स्वीकारू नयेत आणि त्यावर कोणतीही कार्यवाही होऊ नये. या बाबतच्या सूचना आपण संबंधित सर्व अधिकाºयांना द्याव्यात अशी मागणी पंडित ह्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.फोर्जरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणीअशा कामांचे प्रस्ताव ज्यांच्या कडून आले आहेत त्यांची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर फोर्जरीचा तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीच्या प्रती त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव, पालघर व ठाणे जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, यांनीही पाठविल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार