हंगाम लांबला : गावरान जांभळे यंदाही महाग झालीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:58 IST2019-05-12T23:58:22+5:302019-05-12T23:58:36+5:30
निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व दिवसेदिवस कमी होत चाललेला पाउस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू बरोबरच रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला आहे.

हंगाम लांबला : गावरान जांभळे यंदाही महाग झालीत
विक्रमगड : निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व दिवसेदिवस कमी होत चाललेला पाउस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू बरोबरच रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला आहे. त्यामुळेच येथील येथील बाजारात गावरान जांभळाची पुरेशी आवक मे महीना सुरु झाला तरी पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या बाजारात दाखल होणारी जांभळे महाग आहेत. तर वातावणातील बदलामुळे हंगाम लांबला आहे. यादरवर्षी ही गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. मात्र जांभळाचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चालेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस जांभुळ उत्पादन व्हायला हवे त्यावेळेस ते होत नसून त्याच्या पिकण्याचा कालवधी लांबून जून उजाडतो व जांभळे खराब होऊन शेतकऱ्यांना व बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते. यंदा जांभुळ उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व साठ ते सत्तर टक्केच उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार वर्गाने सांगितले.
विक्रमगड हा जंगली भाग असल्याने जांभळाचे चांगले उत्पादन आहे परंतु गेल्या दोन चार वर्षांपासून पाहिजे तसे उत्पादन निघत नाही.
गावरान जांभूळ झाले दुर्मिळ
जांभळाचे उत्पादनासाठी पोषक वातारण मिळत नसल्याने गावरान जांभळे यावर्शीही दुर्मिळ झालेला आहे. गेल्या दोन-चार वर्शा पासुन जुनी जांभळाची झाडेही कमी झालेली आहेत. व शील्लक राहीलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाही पुर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही त्यामुळे गावरान जांभाळाचा पिहल्या प्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झालेले आहे.
यंदा हवामानातील बदलामुळे आंबा काजु उत्पादना प्रमाणेच जांभळालाही उशिराने मोहर येउन हंगाम उशिराने सुरु झाल्याने जांभळाचे उत्पादन व मिळणारा पैसा येथील बागायदारांना कमी मिळणार आहे.
जांभुळ व्यवसाय वातावरणातील होत असलेला सततच्या बदलामुळे फक्त मे मिहन्या व जुनच्या सुरु वातीला चालणार असल्याने शेतक-यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. परंतु सध्या उत्पादीत जांभुळ पिकाला मोठी मागणी असून महाग का होईना ग्राहक त्याची खरेदी करीत आहेत.
दोन महिन्यांत मिळते हजारो रु पयांचे उत्पन्न
एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतच हा व्यवसाय चालत असतो, बागयतदारांना जांभूळ पिकापासून या महिन्यांत ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळते तर आदिवासी खेडया-पाडयांतील जंगल भागातील महिला भरलेल्या जांभळाच्या टोपल्या विकुन याच दोन महिन्यांत १५ ते २० हजार रु पये कमवित असतात.
दिवस उगवला की पहाटेच या महिला जांभळे करंडयात (टोपलीत) भरुन विकण्यासाठी मोठया शहरांकडे जात असतात. या हंगामात सध्या बाजारात लहान जांभूळ १२० रु पये किलो तर मोठे जांभूळ १६० रुपये किलो प्रमाणे विकले जात आहे असे विक्र ी करणाºया वनीता दोंडे या जांभूळ विक्रेत्या महिलेने सांगितले.
परंतु वातावरणातील बदलांचा परिणाम शेतीव्यवसाया बरोबरच रानमेव्यावरही होतांना दिसत आहे. त्यामुळे जांभळे, करवंदे, काजू, आंबा याची आवक दिवसेंदिवस
कमी झाल्याने दुर्मिळ होतांना दिसत आहेत.