शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

आयुष्यातील संकटांना वेलकम म्हणा - सिंधुताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 2:58 AM

सगळ्या महिलांनी हसत-हसत आयुष्याला सामोरे गेले पाहिजे. आपल्या समोर आलेल्या संकटाला वेलकम म्हटले पाहिजे, देशाचे दु:ख आपले दु:ख समजून ते दूर केले पाहिजे, असे उदगार अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चहाडे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व वेदांता हॉस्पिटल यांच्यामार्फत आयोजित महिला मेळावा व महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

नंडोरे : सगळ्या महिलांनी हसत-हसत आयुष्याला सामोरे गेले पाहिजे. आपल्या समोर आलेल्या संकटाला वेलकम म्हटले पाहिजे, देशाचे दु:ख आपले दु:ख समजून ते दूर केले पाहिजे, असे उदगार अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चहाडे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व वेदांता हॉस्पिटल यांच्यामार्फत आयोजित महिला मेळावा व महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले.महिला सक्षमीकरणाबद्दल बोलताना त्यांनी मी ही माझ्या जीवनात अनेक ठोकरा खाल्यात मात्र त्यावेळी मी त्या परिस्थितीला सामोरे गेले व दुसऱ्यांचे दु:ख समजून घेतले ज्यांना समाजाने स्वीकारले नाही अशानां मी स्वीकारले म्हणूनच आज मी अनाथांची माय म्हणून संबोधिली जाते. महिलांनी या गोष्टीचे आचरण करून निर्भीड बनावे असा सल्ला देऊन दु:ख सोसण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी महिलेचा जन्म आहे हे त्यांनी सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई, बहिणाबाई आदी महान स्त्रियांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे कार्य येथे मोठे असून सामाजिक बांधिलकी जपली जाते. शिक्षण असो, वैद्यकीय असो वा आर्थिक मदत असो त्या भावनेतून पुढे येऊन आपल्या कष्टाचा वाटा समाजाप्रती अर्पण करीत असल्याबद्दल त्यांनी निलेश सांबरे यांचे कौतुक करावे तितके कमी असल्याचे यावेळी सांगितले.सकाळच्या सत्रातील हळदी कुंकू कार्यक्रमात प्लॅस्टिक बंदीचे महत्व पटविण्यासाठी जिजाऊ संस्थेतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. रांगोळी स्पर्धा ही घेण्यात आल्यात. यशदा पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ.सुमंत पांडे यांचे महिला सबलीकरणावरील मार्गदर्शनही यावेळी यानिमित्ताने लाभले. महाआरोग्य शिबिरात सुमारे १ हजार महिलांनी येथे उपलब्ध करून दिलेल्या विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला व या आरोग्य सेवा पुढेही येथे देण्यात येणार असल्याची ग्वाही निलेश सांबरे यांनी दिली. नरेश आकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेचे कार्य व माहिती विशद केली. त्यानंतर भावनादेवी सांबरे,वेदांताचे सनद कुमार प्रभू, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आदींना मार्इंच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अपार कष्ट करून यशस्वितेची शिखरे गाठलेल्या महिला उद्योजक रोशनी सुलाखे, आजपर्यंत विविध प्राण्यांना जीवदान देणार्या डॉ.सायली भानुशाली कसलीही तमा न बाळगता हातात स्टेरिंग घेणारी रिक्षाचालक योगिता मुखर्जी, राष्ट्रीय नेमबाज पूजा पाटील, महिला कबड्डीच्या मैदानावर राज्य गाजवणार्या तन्वी सुर्वे, श्रेया घरत, क्षितिजा पाटील, तनुजा नाईक, प्रतिभा क्षीरसागर, पूर्वा भोईर यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार