शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वाढवणच्या बंदरासाठी डोंगरांवर येणार संक्रांत, भरावासाठी दगड, मातीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 08:42 IST

वाढवण बंदर उभारणीसाठी लागणारे दगड, मुरूम, मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगराचे शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

- हितेन नाईक पालघर : वाढवण बंदर उभारणीसाठी लागणारे दगड, मुरूम, मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगराचे शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. ७ कोटी ब्रास दगड आणि १० कोटी ब्रास माती-मुरुमाचा प्रचंड भराव घातला जाणार असून यासाठी अनेक डोंगर नष्ट केले जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.वाढवण बंदर उभारणीसाठी पर्यावरण, वन आणि हवामान खात्यांची मंजुरी केंद्र सरकारने मिळवली असून वाढवण बंदर झाल्यास परिसरात त्याच्या होणाऱ्या प्रभावाचे मूल्यांकन, अभ्यास करण्यासाठी मान्यता दिली आहे. दुसरीकडे अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी जल ऊर्जा संशोधन केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आदी अनेक संस्थांना नियुक्त करण्यात आले आहे. परंतु कुठल्याही संस्थांना वाढवणच्या भूमीवर स्थानिकांनी एकजुटीचे दर्शन घडवीत पाय ठेवू दिलेला नाही. लोकशाही मार्गाने स्थानिकांच्या सुरू असलेल्या लढ्यामुळे जेएनपीटी आणि जिल्हा प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. परंतु केंद्राच्या दबावामुळे सध्या वरवर शांत दिसत असलेल्या जिल्हा प्रशासनाने वाढवण बंदरात  भरावासाठी डोंगर शोधण्याचे काम तहसीलदार पालघर, मंडळ अधिकारी बोईसर, मनोर आणि वन परिक्षेत्र अधिकारी बोईसर, मनोर यांच्यावर ४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोपवण्यात आले आहे. समुद्रात ५ हजार एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या महाकाय जेट्टीसाठी सुमारे ७ कोटी ब्रास दगड आणि १० कोटी ब्रास माती-मुरूम लागणार असल्याची महिती पुढे येत आहे.जिल्ह्यात उपवन संरक्षक डहाणू आणि जव्हार विभागासह वनविकास महामंडळ या विभागाकडे वन, जंगले, डोंगर आदींचा ताबा आहे. पालघर महसूल विभागांतर्गत बोईसर आणि मनोर मंडळ अधिकारी क्षेत्रात एकही डोंगर मालकीचा नसून डहाणू उपवन संरक्षक अंतर्गत असलेल्या तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई क्षेत्रात अनेक डोंगर आहेत. वन विभागाकडून डोंगराचा ताबा मिळवून त्यातून दगड, मुरूम मिळविण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करणार असून त्याला विरोध झाल्यास परदेशातून महाकाय जहाजाद्वारे हे गौण खनिज आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार