शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेतीमाफियांची टेहळणी, अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पगारी नोकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 3:28 AM

जिल्ह्यातील रेती माफियांच्या नाड्या आखडून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनेक उपाय आखल्या असल्या तरी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी रेतीमाफीयानी नाक्यांनाक्यावर तरुणांची एक टीम कार्यरत ठेवली आहे.

पालघर - जिल्ह्यातील रेती माफियांच्या नाड्या आखडून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनेक उपाय आखल्या असल्या तरी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी रेतीमाफीयानी नाक्यांनाक्यावर तरु णांची एक टीम कार्यरत ठेवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रत्येक अधिकाºयांच्या हालचाली वर लक्ष ठेवले जात असल्याचे पुरावे पत्रकार हेमेंद्र पाटील यांनी सोशल मीडियासह सर्व महत्वपूर्ण अधिकाºयांना पाठविले असून कारवाईचे आव्हानच पोलीस महासंचालकाना दिले आहे.पालघर जिल्हा निर्मिती नंतर मोठ्या प्रमाणात सर्वत्र रहिवास संकुलाच्या उभारणीचे काम जोरात सुरू झाले आहे.मात्र या बांधकामांना लागणाºया रेतीवर बंदी असल्याने रेतीचा तुटवडा सर्वत्र भासत आहे. ७ ते ८ हजार रु पये ट्रक मिळणाºया रेतील आज १२ ते १५ हजाराचा भाव आकारला जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार रेती उत्खननाला बंदी असल्याने सर्वत्र रेती वाहतुकीलाही बंदी आहे. चोरट्या रेती वाहतुकीला आळा बसविण्यासाठी सुमारे ९९ हजाराचा दंड एका ट्रक मागे महसूल विभागाकडून वसूल केला जातो. मात्र, तरीही रेतीला मोठी मागणी असल्याने चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक सुरूच आहे.सुर्या-वैतरणा नद्यांमध्ये उच्चप्रतिची रेती असल्याने तीरावर वसलेल्या काही गावाना माठ्या प्रमाणात रेतीचा व्यवसायातून उत्पन्नाचे साधन मिळाले असले तरी अधिक पैश्याच्या हव्यासापोटी मागील काही वर्षात सक्शन पंपाद्वारे नदीतून काढलेल्या रेती साठ्यामुळे नदी किनाºयावरील शेती-बागायती नदीपात्रात धडाधड कोसळू लागल्या आहेत. पालघर, बोईसर, मुरबे,मासवन, सफाळे, चहाडे, तांदुळवाडी, नावझे, बहाडोली, नारिंगी, वैतरणा आदी अनेक रेती बंदरातून मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असल्याने सर्व रेती बंदरात सीसीटीव्ही कॅमेरे सह पोलीस, शासकीय अधिकारी- कर्मचाºयांच्या टीम, आरटीओ पथके तैनात करण्यात आल्या आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी रेती माफियांना चांगलाच वचक बसविला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात हा वाचक हळूहळू सैल होताना दिसत आहेत. रेती चोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाºयांवर हल्ले होत असून त्यांच्यावर दगडफेक करण्या इतपत धाडस रेतीचोरा मध्ये निर्माण झाले आहे.रेती माफीया व गौणखनीज वाहतूक करणाºयांंनी महसूल व आरटीओ विभागावर पाळत ठेवण्यासाठी व्हाँटसपवर ग्रुप बनवून त्यावरून संबंध अधिकारी यांच्या मार्गावर पगारी तरु णांची नियुक्ती केली आहे.महसूल अधिकारी यांच्या घरापासून ते त्यांच्या वैयिक्तक गोष्टीवर देखील हे माफिया पाळत ठेवत आहेत. यात धक्कादायक माहिती म्हणून जिल्हाधिकारी यांची गाडी पालघर कार्यालयातून पास झाल्यानंतर त्यांच्या गाडीवर पाळत ठेवण्यात येऊन आरटीओ वसई येथुन आलेल्या अधिकारी यांच्या वर देखील पाळत ठेवण्यात येत आहे. सदर अधिकारी यांची वाहने पास झाल्यावर व्हाँटसप ग्रुप मधुन अँडिओ मार्फत पाठवलेली माहिती पुराव्यासह पत्रकार पाटील ह्यांनी अनेक सोशल मीडिया ग्रुपवर पाठवली आहे.त्यातील संभाषण खात्रीलायक सुत्रा कडुन(नाव नंबरसह) त्यांनी पोलीस महासंचालकाना पाठवली आहेत. ही माहिती सर्वत्र पसरल्यानंतर अनेक ग्रुप बंद झाले असून अनेक रेतीमाफीया उद्योजक या ग्रुपमधुन बाहेर पडले आहेत. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व पालघर, बोईसर, तारापुर, मनोर, विरार, वसई या पोलिस स्टेशन च्या सर्व अधिकारी यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी पासुन आता पर्यंतचे फोन डिटेल्स ची चौकशी आपण सीआयडी मार्फत केली तर रेतीमाफीया यांचे पालघर पोलिसां सोबतचे लागेबांधे उघड होतील असा विश्वास तक्र ारकर्ते पाटील यांनी व्यक्त केला आहे.९९ हजाराच्या दंडाला सुद्धा माफीया जुमानेनाचोरट्या रेती वाहतुकीला आळा बसविण्यासाठी सुमारे ९९ हजाराचा दंड असला तरी महिनाकाठी २५ ते ३० लाख रु पयांचा हप्ता पुरविण्यात येत असल्याची चर्चा असून हा पैसा कोणाच्या खिशात जातो याचे वाटेकरी कोण आहेत. याचा शोध घेणे गरजेचे आहे.जिल्हा खनिकर्म अधिकारी घुले यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्या नंतर ही प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे रेती चोरी विरोधात काम करणाºयाचे खच्चीकरण होत असल्याची भावना कर्मचाºयांमध्ये निर्माण होतात दिसत आहे.अशी रोखा रेतीतस्करीमुरबे खाडीतून मोठ्या प्रमाणात आजही रेती उत्खनन होत असून पालघर मधील चार रस्त्यावरील पोलीस चौकीच्या मागे असणारा अड्डा पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी बंद करून तेथील सीसीटीव्ही ची कार्यक्षमता वाढविल्यास रेतीची चोरटी वाहतूक आणि खाजगी लोकांकडून होणारी वसुली रोखता येईल.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या