शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

शिक्षकांचे वेतन टीडीसी बँकेतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:19 AM

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ठरावीक बँकेतूनच होण्यासाठी सक्ती नसावी. हा शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाºयांचा ऐच्छिक प्रश्न असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ठरावीक बँकेतूनच होण्यासाठी सक्ती नसावी. हा शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाºयांचा ऐच्छिक प्रश्न असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यामुळेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेतून २० हजार शिक्षकांचे पगार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केला. दरम्यान, शिक्षक संघटनांनीही टीजेएसबीऐवजी ‘टीडीसीसी’ बँकेतूनच वेतन करण्याची जोरदार मागणी केली आहे.शिक्षकांचे वेतन टीडीसीऐवजी टीजेएसबी सहकारी बँकेतून होणार असल्याने शिक्षकांनी या बँकेत खाती उघडावीत. खाती उघडण्यास विलंब करणाºयांच्या वेतनालाही विलंब होईल, असे पत्रच ठाणे शिक्षणाधिकाºयांनी शिक्षकांना दिले. या पार्श्वभूमीवर टीडीसी बँक आणि शिक्षक संघटनांनी यासंदर्भातील शासनाचा आदेश आणि शिक्षणाधिकाºयांच्या वादग्रस्त आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. याचिकेच्या २५ जुलै रोजी झालेल्या सुनावणीची माहिती देण्यासाठी टीडीसी बँकेत पत्रकार परिषद आयोजित केले होती.ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील २० हजार शिक्षकांचे पगार ४० वर्षांपासून टीडीसी बँकेतून होत आहेत. सरकारने १४ जून रोजी अध्यादेश काढून शिक्षकांचे पगार ‘टीजेएसबी’ बँकेतून होतील, असे म्हटले होते. याच अध्यादेशाच्या आधारे शिक्षणाधिकाºयांनी सर्व शाळांना पत्र पाठवून शिक्षकांनी टीजेएसबी बँकेत खाती उघडावीत, अन्यथा जुलै महिन्याचा पगार काढणार नाही, अशी ताकीद दिली. त्यास टीडीसी बँकेच्या संचालक मंडळाने आणि सात शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शासनाच्या या आदेशामुळे टीडीसी बँकेतील १५ हजार शिक्षकांची खाती बंद होणार असल्यामुळे त्याचाही बँकेच्या उलाढालीवर परिणाम होईल. शिवाय, खेडोपाडी शाखा नसणाºया टीजेएसबीच्या शाखेत पगार काढण्यासाठी जायचे असेल, तर शिक्षकांना रजाच काढावी लागेल. १४ हजार शिक्षकांसह सात संघटनांचाही या सक्तीला विरोध असल्याचे शिक्षक संघटनेचे पुरुषोत्तम पाटील यांनी म्हटले. टीडीसी बँकेत किंवा मग राष्टÑीयीकृत बँकेत पगार व्हावेत, अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.