प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 21:02 IST2025-10-05T20:55:46+5:302025-10-05T21:02:08+5:30
विरार ते पालघरदरम्यान, सुरु असलेल्या रो रो बोट सेवा तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली होती.

प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
Ro-Ro Service Virar to Palghar:विरार ते खारवाडेश्री (सफाळे) या रो-रो सेवेची बोट रविवारी म्हारंबळपाडा जेटीजवळ समुद्रात अडकल्याने गोंधळ निर्माण झाला होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वाहने भरल्यामुळे बोट समुद्रात अडकली. त्यामुळे अर्धा तास प्रवासी बोटीतच अडकले होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विरार-पालघर रो-रो सेवेला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र रविवारी झालेल्या दुर्घटनेमुळे प्रवासी चिंतेत सापडले आहेत.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेल्याने सफाळे-विरार रो-रो फेरी सेवा म्हारंबळ पाडा जेट्टीजवळ अडकली. बोटीच्या रॅम्पवरील हायड्रॉलिक पाईप तुटल्यामुळे रो-रो अडकून पडली होती. प्रवासी ३० मिनिटांहून अधिक काळ बोटीवर अडकून पडले होते. बराच वेळ बोट पुढे सरकत नसल्यामुळे बोटीवरील प्रवाशांमध्ये सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
रो-रो बोटीवर २०० हून अधिक प्रवासी आणि ७५ पेक्षा जास्त दुचाकी–चारचाकी वाहने असल्याचे म्हटलं जात आहे. बोट सुरु झाल्यानंतर रॅम्प उचलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप अचानक तुटला. त्यामुळे बोट म्हारंबळ पाडा जेट्टीच्या जवळच थांबवण्यात आली. प्रवासी अर्धा तास बोटीवर ताटकळत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला होता.
Maharashtra: The Saphale–Virar Ro-Ro ferry service was stranded near Marambal Pada jetty after carrying passengers beyond capacity. A broken hydraulic pipe on the boat’s ramp brought operations to a halt, leaving passengers stranded for over 30 minutes pic.twitter.com/t7Yg03SKzm
— IANS (@ians_india) October 5, 2025
दरम्यान, खारवाडेश्री ते नारंगी या ६० किलोमीटर अंतरासाठी दीड तासांचा कालावधी लागतो. हा प्रवास रो रो बोटीने केल्यास दीड किलोमीटरचे अंतर साधारण १५ मिनिटांत पार करता येत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी खाजगी वाहनातून महामार्गाने प्रवास न करता सफाळे ते विरार दरम्यान असलेल्या या रो रो सेवेचा लाभ घेत आहेत.