विक्रमगडमधील शेतक-यांची आगोट खरेदीसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:25 IST2019-05-30T23:25:42+5:302019-05-30T23:25:50+5:30
असंख्य दुकाने :कांदे,बटाटे,लसूण,तिखट मिरची व हळदीची साठवण

विक्रमगडमधील शेतक-यांची आगोट खरेदीसाठी धावपळ
विक्रमगड : पावसाळयात शेती हंगामात न मिळणा-या वस्तू व त्यावेळेस सा-याच वस्तूंचे भाव चढे असल्याने पावसाळयासाठी व दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्याठी येथील गाव-खेडयाचे शेतकरी आठवडे बाजारात दाखल होत असून कांदा, बटाटा व लसूण, तिखट मिरची, हळद आणि कडधान्य खरेदी करतांना दिसत आहेत़ कांद्याच्या गोण्याच्या गोण्या खरेदीकरीतांना दिसत आहे. एकदा का पावसाळयात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहट (खरेदी)करण्यास वेळ मिळत नसल्याने आगोटची खरेदी केली जात आहे़ येथील शेतकरी पावसाळयाच्या हंगामासाठी केलेल्या खरेदीला अगोट संबोधत असतात.
दरम्यान तिन ते चार महिने पुरेल असा साठा करुन ठेवतो़ व चार महिने या वस्तूंचा आस्वाद घेत असतो कारण आज बाजारात कांदा १० लसूण ८० बटाटे २० तिखट मिरची १५०, हळद १२० रुपये किलो दरापासून उपलब्ध आहे़ व याच वस्तंूचा भाव पावसाळयात दुपटीने वाढलेला असतो़ त्यामुळे या उन्हयाच्या शेवटच्या महिन्यातच ही खेरदी केली जाते़ पावसाळा जवळ आल्याने ग्रामीण भागातील शेतक-यांनी, अगोटाच्या खरेदीला सुरुवात केली आहे.