शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली! प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव : बाजारांत सामाजिक अंतराचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:04 IST

कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात.

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात दररोज मृत्यू पावणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली व खुद्द वसई-विरार महापालिकेकडूनही नियोजनाचा अभाव असल्याने कोविड-१९ च्या संक्रमणाचे सावट कायम आहे.कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात. बहुतांश ठिकाणी तर भाजी विक्री व्यावसायिक प्रचंड प्रमाणात वाढलेले निदर्शनास येत आहेत. परिणामी भाजी बाजारात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. विशेष म्हणजे पालिकेने या भाजी विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे म्हणून मार्किंग करून त्याच जागेत बसण्याकरिता बजावलेले असतानाही या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, तर ग्राहकांचीही फेरीवाल्यांच्या गाड्यांसभोवती खरेदीसाठी गर्दी उसळत असतानाही यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. विशेष म्हणजे याविरोधात पालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केल्यास दखल घेतली जात नाही, तर काही वेळा या फेरीवाल्यांकडून चिरीमिरी घेऊन पालिका कर्मचारीच या फेरीवाल्यांना मुख्य मार्गावरून उठवून गल्लीबोळात व्यवसाय करण्याची मुभा देत आहेत. याचे परिणाम म्हणून अनेक ठिकाणी मर्यादित वेळेनंतरही काही दुकाने पुढून बंद असली तरी मागून सुरू असताना दिसतात. अशा कित्येक दुकानदारांची पाहणी करून मग पोलीसही वसुली करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोविड-१९ संक्रमणाला रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे..नागरिकांची भटकंती सध्या प्रामाणिकपणे घरी बसून सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांची नाहक कोंडी झाली आहे. आपण किती दिवस घरी बसून राहायचे? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सोबतच कारणाशिवाय फिरणाऱ्या व्यक्तींची धरपकड करून पोलीस त्यांची अँटिजन टेस्ट करत असले तरी कडक नियमावली नसल्याने बेफिकीर नागरिकांच्या भटकंतीत कमी आलेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या