दसऱ्याच्या मुहूर्तावर आरटीओला झाला धनलाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:30 IST2018-10-19T23:30:17+5:302018-10-19T23:30:33+5:30
नालासोपारा : विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आर.टी.ओ) तब्बल १ कोटी २९ लाख ९२ हजार रूपयांचा वाहन ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर आरटीओला झाला धनलाभ
नालासोपारा : विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आर.टी.ओ) तब्बल १ कोटी २९ लाख ९२ हजार रूपयांचा वाहन खरेदी करापोटी महसूल मिळाला आहे. एका दिवसात ३०२ वाहनांची विक्र ी झाली असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाºया विजयादशमीला सोन्याचे दागिने, वाहन, व्यवहार, नवीन वास्तू खरेदी केली जाते. मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी होत असल्यामुळे वसई विरारमधील वाहनविक्रीची अधिकृत डिलर्सकडे गेल्या दोन दिवसांपासून वाहन खरेदी व बुकींगसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळत होती. विरार पूर्व येथेल चंद्र येथे उपप्रादेशिक कार्यालयात दसºयाला आपल्या नवीन वाहनांची नोंदणी करून घेण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. यावेळी वाहन नोंदणीतून करापोटी १ कोटी २९ लाख ९२ हजार रूपयांचा महसूल जमा झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. दिवसभरात ३०२ वाहनांच्या नोंदी करण्यात आल्या असून त्यात ५० चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
विरार पूर्व चंद्र येथे वर्ष २०११ पासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले असून, जिल्ह्यातील आठ तालूक्यांतील कारभार येथून नियंत्रित केला जातो. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक वाहनांच्या नोंदी या कार्यालयात करण्यात आल्या आहेत. गतवर्षी २११ कोटी रूपयांचा महसूल वाहन नोंदणीतून मिळाला होता.