शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

वाडा शहरातील रस्ते होणार चकाचक

By admin | Updated: March 22, 2017 01:15 IST

शहरांतर्गत रस्त्यांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरांनी आदिवासी विकास विभागाच्या मार्च २०१७ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून

वाडा : शहरांतर्गत रस्त्यांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरांनी आदिवासी विकास विभागाच्या मार्च २०१७ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून सुमारे दीड कोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. त्यामुळे सर्व नगरे व उपनगरांतील रस्ते चकाचक होणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील तलावाचे सुशोभीकरण व नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी अल्पावधीतच नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते. अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने नागरिकांना या रस्त्यांवरून चालणे व वाहन चालविणे अत्यंत जिकरीचे झाले होते. पंचायत समितीच्या उपसभापती माधुरी पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप पवार व शहराध्यक्ष स्वप्नील रोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याने मंत्री सवरांनी प्राधान्याने शहरातील विकासकामे मंजूर केली आहेत. शहरातील शास्त्री नगर येथील अंतर्गत रस्ता, मेनरोड येथील पोतदारांचे घरापासून ते मुस्लिम मोहल्ला रस्ता, नेहरू नगर ते पिक कॉलनी रस्ता, कृषी कार्यालयापासून ते विवेकनगर रस्ता, अंजनी नगर ते भंसाळपाडा रस्ता, शिवाजी नगर येथील अंतर्गत रस्ता, ग्रामपंचायत ते भाजी मार्केट रस्ता, आदी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्रत्येकी सुमारे दहा लाख रु पयांचा निधी तर कैलास टॉकीजच्या मागील हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्यासाठी सुमारे ७० लाख रु पयांचा निधी पालकमंत्री सवरा यांनी आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूदीमधून दिला आहे.(वार्ताहर)