वाडा शहरातील रस्ते होणार चकाचक

By admin | Published: March 22, 2017 01:15 AM2017-03-22T01:15:56+5:302017-03-22T01:15:56+5:30

शहरांतर्गत रस्त्यांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरांनी आदिवासी विकास विभागाच्या मार्च २०१७ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून

Road to the Wada City will be the pulsation | वाडा शहरातील रस्ते होणार चकाचक

वाडा शहरातील रस्ते होणार चकाचक

Next

वाडा : शहरांतर्गत रस्त्यांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरांनी आदिवासी विकास विभागाच्या मार्च २०१७ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून सुमारे दीड कोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. त्यामुळे सर्व नगरे व उपनगरांतील रस्ते चकाचक होणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील तलावाचे सुशोभीकरण व नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी अल्पावधीतच नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने नागरिकांना या रस्त्यांवरून चालणे व वाहन चालविणे अत्यंत जिकरीचे झाले होते. पंचायत समितीच्या उपसभापती माधुरी पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप पवार व शहराध्यक्ष स्वप्नील रोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याने मंत्री सवरांनी प्राधान्याने शहरातील विकासकामे मंजूर केली आहेत.
शहरातील शास्त्री नगर येथील अंतर्गत रस्ता, मेनरोड येथील पोतदारांचे घरापासून ते मुस्लिम मोहल्ला रस्ता, नेहरू नगर ते पिक कॉलनी रस्ता, कृषी कार्यालयापासून ते विवेकनगर रस्ता, अंजनी नगर ते भंसाळपाडा रस्ता, शिवाजी नगर येथील अंतर्गत रस्ता, ग्रामपंचायत ते भाजी मार्केट रस्ता, आदी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्रत्येकी सुमारे दहा लाख रु पयांचा निधी तर कैलास टॉकीजच्या मागील हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्यासाठी सुमारे ७० लाख रु पयांचा निधी पालकमंत्री सवरा यांनी आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूदीमधून दिला आहे.
(वार्ताहर)

Web Title: Road to the Wada City will be the pulsation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.