शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात चिकू बागांना रोगांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:57 IST

बागायतदारांना आर्थिक फटका : तालुका कृषी विभागाकडून उपाययोजनांविषयी आवाहन

अनिरुद्ध पाटील डहाणू : जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चिकू फळपिकावर फायटोपथोरा या बुरशीजन्य रोगामुळे फळांवर काळे डाग पडतात. प्रथम जमीनीलगत आणि त्यानंतर संपूर्ण झाडाला लागण होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन बागायतदारांनाना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. दरम्यान रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्राथमिक उपाय योजावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी केले आहे.

चिकूला भौगोलिक मानांकन, फळपीक विमा कवच आदी सुविधा मिळू झाल्यानंतर निर्यातक्षम फळांचा दर्जा उत्तम राखणे आवश्यक आहे. याकरिता बागा रोगमुक्त होण्याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान जुलै आणि आॅगस्ट महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मादी पंतग फळाच्या देठावर, कळयांच्या पाकळ्यावर, तयार होत असलेल्या फळावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली सूक्ष्म अळी देठाच्या भागाकडून कळीच्या पाकळ्या खाऊन फळात प्रवेश करून गरातून थेट बीमध्ये प्रवेश करते. अळी सूक्ष्म असल्याने तीने पाडलेले छिद्र फळ वाढताना भरून येते. फळाचे बाहेरून कोणतेही लक्षण दिसून येत नाही.योजावयाचे प्राथमिक उपाय:च्झाडावरील रोगट, कमी उत्पादन देणाऱ्या फांद्या कापून बोर्डोपेस्ट लावावे. बोर्डोपेस्ट तयार करताना १ किलो मोरचुद व १ किलो कळीचा चुना घेऊन १० ते ३० लिटर पाणी वापरावे. बोर्डोेपेस्ट वापराने फांद्याच्या कापलेले भागावर सूक्ष्म जिवाणू व बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते.च्पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतात चर काढावेत. बागेत खाली पडलेला पालापाचोळा, कचरा साफ नसल्याने किड व रोगास पोषक वातावरण तयार होते. याकरिता पावसाळ्यापूर्वी बाग स्वच्छ करून घ्यावी. जमिनीतील कोष व अळ्या नष्ट करण्यासाठी एकरी १२ किलो कार्बारील भुक्टी जमीनीत मिसळावी.बागेचे व्यवस्थापन करताना प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १५ मि.लि. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. याकरिता एक महिन्याने २.८ टक्के डेल्टामेथ्रीन १० मि.लि. त्यानंतर एक महिन्याने तिसºया फवारणीसाठी लॅम्डा सायहॅलोथ्रिन ५ टक्के १० मि.लि. आणि नंतर चौथ्या फवारणीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के ५ मि.लि. १० लि. पाण्यातून फवारणे आवश्यक असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक सुनील बोरसे यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी