शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नागरिकत्व कायद्याविरुद्ध रिक्षाचालकांचा ‘रास्ता रोको’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 23:39 IST

भिवंडीत रिक्षा वाहतूक बंद : विद्यार्थी, नोकरदार यांचे झाले हाल; ठिकठिकाणी आंदोलने

भिवंडी : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करवून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन झाले आहे, असा आरोप करीत भिवंडी तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाने सोमवारी रिक्षांचा १२ तासांचा बंद पुकारला होता. या बंदमध्ये शहरातील १९ रिक्षा संघटनांनी सहभाग घेतला होता. शहरातील आनंद दिघे चौक येथे दुपारी ३ वाजता काहीवेळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे भिवंडीतील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते.

सकाळी रिक्षाबंद आंदोलनामुळे शालेय विद्यार्थी, कामगार व नोकरदारवर्गाचे हाल झाले. मात्र, काही ठिकाणी रु ग्णांचे व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बंदमध्ये सहभाग न घेता रिक्षा रस्त्यावर उतरवून प्रवाशांना दिलासा दिला. त्यामुळे आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भिवंडीत काही दिवसांपासून विविध पक्ष व संघटनांमार्फत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी भिवंडीत तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाच्या वतीने आनंद दिघे चौकात ‘रस्ता रोको’ आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा कायदा रद्द करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली. देशामध्ये महागाई वाढत आहे. उद्योग, व्यवसाय डबघाईला आले आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे अनेक प्रश्न व समस्या असताना शासन मुक्याची भूमिका बजावत आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाने विकासात्मक धोरण राबवण्याऐवजी धार्मिक तृष्टीकरण करून जनतेला वेठीस धरले आहे. असा आरोप रिक्षाचालक संघटनेने केला. संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी खालीद खान, कॉ. सुनील चव्हाण, अस्लम काबाडी, अय्युब शेख, अख्तर (बाबू) शेख, अनंता गुळवी, इद्रीस शेख आदींसह रिक्षाचालक सहभागी झाले.भिवंडीत एमआयएमचा कॅण्डल मार्चभिवंडी : केंद्र शासनाने लागू केलेल्या एनआरसी व सीएए कायद्यांविरोधात सोमवारी सायंकाळी ६ वाजता एमआयएमचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील कोटर गेट मशीद ते जुनी महापालिका कार्यालय असा कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. सुरुवातीला कोटर गेट मशीद ते धर्मवीर आनंद दिघे चौक असा हा मार्च निघणार होता. मात्र, त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, या कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर १७ जानेवारी सुनावणी होणार असल्याचे गुड्डू यांनी सांगितले.मीरा रोडमध्ये समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीममीरा रोड : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात शहरात आंदोलने सुरू आहेत. त्याला उत्तर म्हणून भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी शनिवारी रात्रीपासून या कायद्यांच्या समर्थनार्थ आंदोलन व सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मात्र भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेने थेट स्वत:च्या नावाने हे आंदोलन करणे टाळले आहे. तर, विरोध आणि समर्थनार्थ चालणाऱ्या आंदोलनांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhiwandiभिवंडी