वसईत मोकाट जनावरांचा सुळसुळाट
By Admin | Updated: March 25, 2017 01:05 IST2017-03-25T01:05:46+5:302017-03-25T01:05:46+5:30
वसईतील मुख्य रस्त्यावर दत्तानी मॉलजवळ मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून रहदारीच्या रस्त्यावर म्हशी बिनधास्तपणे

वसईत मोकाट जनावरांचा सुळसुळाट
वसई : वसईतील मुख्य रस्त्यावर दत्तानी मॉलजवळ मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून रहदारीच्या रस्त्यावर म्हशी बिनधास्तपणे फिरत असल्याने मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त करण्यात येते.
विरार-वसई परिसरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरताना दिसतात. त्यातल्या त्यात वसई स्टेशन ते वसई गाव दरम्यान दत्तानी मॉल नजिक मोकाट जनावरे मुख्य रस्त्यावर फिरत असताना दिसतात. हाच प्रकार नालासोपारा शहरातील काही रस्त्यांवर पहावयास मिळतो. मात्र, मोकाट जनावरांवर पकडून नेण्यात वसई विरार महापालिका अपयशी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे ट्रॅकवर आल्याने विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली सापडून सात मोकाट म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी मोटरमनच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. तशाच पद्धतीचा मोठा अपघात वसईतील रस्त्यांवर घडण्याची भिती व्यक्त करण्यात येते. (प्रतिनिधी)