शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बुलेट ट्रेनविरोधात पुन्हा उद्रेक; सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 11:30 PM

पाचव्यांदा जावे लागले माघारी

हितेन नाईकपालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनविरोधातील स्थानिकांचा उद्रेक अद्यापही शमला नसून नंडोरे ते कल्लाळे येथे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करू न देताच स्थानिक आणि आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पिटाळून लावले. दरम्यान, जमीन सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना पाचव्यांदा रिकाम्या हाताने माघारी जाण्याची नामुष्की ओढवल्याचे सांगण्यात आले.

विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर जबरदस्तीने केला जात असल्याने आदिवासी बेदखल होत आहे. त्यामुळे सरकारने आदिवासी समाजाला सुरक्षितता प्रदान करावी, त्यांना घटनेच्या पाचव्या अनुसूचीने, त्यांच्या ग्रामसभांना अधिकार देऊन आदिवासीने संरक्षण दिले आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने जिथे जिथे आदिवासी समाज राहतो, तिथे त्यांच्यावर सरकार आणि उद्योगपतीकडून अन्याय केला जात असल्याची खंत छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके यांनी नुकत्याच पालघर येथे झालेल्या आदिवासी एकता महासंमेलनात व्यक्त केली होती. राज्यपाल हे आदिवासी समाजाचे संरक्षक असून संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारान्वये त्यांना न्याय देण्याचे काम राज्यपालांचे असल्याचे मतही राज्यपाल उईके यांनी व्यक्त केले होते.

जिल्ह्यातील वसईपासून ते बोईसरदरम्यानच्या पूर्व पट्टीतील जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील १८७ हेक्टर जमीन संपादनापैकी अवघ्या १० हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे. तर ७१ गावांपैकी ६ गावांचे सर्वेक्षण करणे आजही बाकी असल्याचे उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी सांगितले. जमीन संपादन करताना कुणावरही जबरदस्ती केली जाणार नसून शासकीय दराप्रमाणे मूल्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र या भागातील बहुतांशी शेतकºयांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाला देण्यास एकजुटीने विरोध दर्शवला आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभांमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात ठराव घेऊन हे ठराव जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल यांना देऊनही आजही आदिवासी व इतर समाजाच्या जमिनी जबरदस्तीने संपादन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या तक्र ारी एकता परिषदेने दिलेल्या आहेत.

बुलेट ट्रेनसाठी लागणारी जमीन संपादन करण्यासाठी संबंधित गावात ग्रामसभा लावायची तर दुसरीकडे बाधित शेतकºयांना कुठलीही पूर्वकल्पना न देता जनसुनावणी आयोजित करायची, ही शासनाने प्रशासनाला हाती धरून चालविलेली खेळी ही आदिवासी एकता परिषद व स्थानिक शेतकºयांनी एकत्र येत उधळून लावल्याचे प्रकार घडले आहेत. तर वैद्यकीय सेवा पुरवणे, बालवाडी उभारणी आदी नानाविध सुविधा पुरविण्याच्या नावाखाली अनेक आमिषे पुरविली जाण्याचा प्रकारही एकता परिषदेने रोखून धरला आहे.प्रकल्प नकोचनंडोरे-पडघा-कल्लाळे या भागात बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी काही अधिकारी फौजफाट्यासह शुक्रवारी आले होते. या वेळी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, शशी सोनवणे, नीता काटकर, भास्कर दळवी, मोरेश्वर दौडा, संतोष मानकर आदी कार्यकर्त्यांशी अधिकाºयांनी चर्चा केली. बुलेट ट्रेनला आमचा विरोध असून आमच्या जमिनी कुठल्याही परिस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाला देणार नसल्याचे स्पष्टपणे ठणकावून सांगितले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन