रावण दहन केल्यास अॅट्रॉसिटी लावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:54 IST2018-10-15T23:54:37+5:302018-10-15T23:54:50+5:30
नालासोपारा : दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यास वसईतील आदिवासी एकता परिषेदने विरोध केला आहे. कुणी रावण दहन केल्यास ...

रावण दहन केल्यास अॅट्रॉसिटी लावा!
नालासोपारा : दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यास वसईतील आदिवासी एकता परिषेदने विरोध केला आहे. कुणी रावण दहन केल्यास त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या संघटनेने पोलिसांकडे केली आहे.
हजारो वर्षांपासून रावण दाहनाची प्रथा सुरू आहे. सत्याचा असत्यावर विजय या अर्थाने दरवर्षी दसºयाला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. पण यावर्षी आदिवासी एकता परिषदेने या प्रथेला विरोध केला आहे. रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीत तज्ञ, राजनीतीज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता.
इतके असतांना त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणे चुकीचे आहे असे परिषदेने म्हटले आहे. रावण दहनाची प्रथा बंद करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
... तर अॅट्रॉसिटी दाखल करू !
मोखाडा : विजयादशमीला रावण व महिषासुरांच्या प्रतिमेचे दहन कराल तर अॅट्रोसिटी दाखल करु , असा इशारा श्रमिक संघटनेने सोमवारी दिला आहे. तिच्या मते या दोघांच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा असून त्यांची चुकीची माहिती सांगितल्याने या प्रथा पडल्या आहेत.
या दोघांचे वैश्विक ज्ञान, संस्कृती, कला आणि विद्येवरचे प्रभुत्व हे अभिमानास्पद आहे. म्हणून त्यांचा अभिमान आम्हाला असताना त्याचे दहन केल्याने आमच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी न्यायालयाने केलेल्या सूचनांची पडताळणी करावी असे म्हटले आहे.