शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

जलचरांनी बहरले बावखल, राकेश रिबेलो या तरूणाचे अथक परिश्रम आले फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 01:09 IST

वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे.

नालासोपारा - वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्या नष्ट होत असताना वसईतील एका तरूणाने गावातील कचरा व मातीने गाडलेली बावखल पुन्हा जिवंत करून दाखवले आहे. राकेश रिबेलो असे या तरूणाचे नाव असून त्याने एकट्याने बुजलेलीे बावखल पुन्हा जीवंत केले. ती मध्ये गोड्या पाण्याचे झरे आढळल्याने बावखल पाण्याने भरून गेले आहेत. त्यात कासव, मासे आदींची सद्या रेलचेल पहायला मिळत आहे.वसईतील पश्चिम पट्यात वाडी, शेतीसाठी व इतर कामांसाठी याच बावखलाचा वापर होतो. बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी बावखले महत्वाचे काम करतात. वसईचा भू प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकांचा बेपर्वा वृत्तीमुळे बावखळे नष्ट होऊ लागली आहेत. परिणामी पर्यावरणाचा समतोलही बिघडू लागला आहे. वसईतील पुर्वी ५०० हून अधिक असणाऱ्या बावखलांची संख्या ३०० पेक्षा कमी झाली असून जी आहेत त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे.रमेदी गावातील खोपवाडी येथे जूने बावखल होते. त्यात रहाट लावून ग्रामस्थ पाणी भरत असत. तसेच, या मुळे परिसरातील कुपनलिका आणि विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असायची. त्या भोवती हिरवी झाडी असल्याने विविध पक्षी येत असत. मात्र, काहींनी मातीचा भराव आणि कचरा टाकून बावखल बुजवून टाकले होते.बोटीवरून गावात परतलेल्या राकेश ने या बावखलाचे महत्व ओळखून ते पुन्हा तयार करण्याचे ठरवले. ग्रामस्थांची परवानगी घेतली मात्र, कुणी प्रत्यक्ष मदतीला आले नाही. त्यामुळे त्याने काही दिवस काम करून कचरा काढून बावखल स्वच्छ केला. त्यानंतर जेसीबी आणून मातीचा भराव काढला. या बावखलाच्या खाली गोड पाण्याचे झरे लागले. काही दिवसात ते बावखल स्वच्छ पाण्याने भरुन गेले आहे. या बावखलात रहाटासाठी लागणारा खुंट, चर्चचा एक क्र ॉस आढळला. या प्रयत्नामुळे तेथे विविध जातीचे मासे आणि कासवे आले आहेत. गावातील तरु ण मासेमारीचा आनंद घेण्यासाठी या बावखलात आता येत असतात.बावखल पुन्हा तयार झाल्याने खोपवाडीची शोभा पुन्हा पुर्ववत झाली आहे. हे गावाचे वैभव असल्याचे गावकरी सांगतात. कुणावर अवलंबून रहाण्यापेक्षा मी स्वत: हे काम केले आणि एक बावखळ वाचवू शकलो याचा मला आनंद आहे असे राकेशने सांगितले. वसईत बावखले वाचिवण्याची मोहीम सुरू आहे. अशा वेळी राकेशने जिवंत करून दाखवलेले बावखल या मोहीमेसाठी स्फूर्तीदायी ठरू शकणार आहे.बावखल म्हणजे काय?पाण्याचा साठा करण्यासाठी खड्डा बनवलेला असतो. त्यास वसईतल्या बोलीभाषेत बावखळ किंवा बावखले असे म्हणतात. बाव म्हणजेच विहीर होय. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गाड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. पूर्वी रहाट बसवून वाडी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी तसेच पाणी पिण्यासाठी देखील याचा वर्षभर वापर केला जात असे.उत्तर कोकणातील काही भागात आजही याचा वापर होतो. बावखलामुळे जमिनीत ओलसरपणा राहतो. त्यामुळे, आजू-बाजूच्या विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहते.’’ बावखलाच्या पाण्यात आजू-बाजूला झाडे-झुडपे फुलत असत. पूर्वी मुले बावखलात पोहोण्यासाठी देखील जात असत. बावखले ही वसईच्या पारंपारिक संस्कृतीची ओळख आहे. बावखलाजवळील गर्द हिरव्या झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाई.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या