शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

नरेशचा मृत्यू पोलिसी अत्याचाराने ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:45 PM

३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने ही आत्महत्या नसून पोलीसी अत्याचारात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

पालघर : पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या कोकनेर या ग्रामपंचायत हद्दीतील राईपाडा येथील नरेश पागी या ३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने ही आत्महत्या नसून पोलीसी अत्याचारात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.एका संशयास्पद प्रकरणाच्या चौकशी साठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नरेशच्या घरी शुक्रवारी आले होते. त्याच्या घराची झडती घेतल्या नंतर त्याला पोलिस ठाण्यात हजर राहण्यास फर्मावले होते. त्याप्रमाणे नरेशचा मामा रघुनाथ व त्याचा लहान भाऊ कैलास यांना सोबत घेऊन नरेश बोईसर येथील पोलीस ठाण्यात गेला होता. तिथे त्याला चौकशीच्या नावाखाली एका खोलीत डांबवून ठेवण्यात आल्याचे त्याचे मामा रघुनाथ यांनी पत्रकारांना सांगितले. नंतर मामा व भावाला पोलिसठाण्यात बसवून ठेऊन त्याला पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्या मामाच्या गावी गुंदले येथे नेले. सायंकाळी पोलीस आले तेव्हा नरेश त्याच्या बरोबर न दिसल्याने त्यांनी नरेशबाबत विचारणा केली असता तो आमच्या तावडीतून निसटून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी कोणतेही कागदपत्रे वाचून न दाखवता जबरदस्तीने मामा व भावाच्या सह्या काही कागदांवर घेऊन या दोघाना घरी जाण्यास सांगितले. घराच्यांनी त्याचा शोध घेऊनही त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. रविवारी एका झाडाला नरेशचा मृतदेह लटकत असल्याचे कळताच आम्हाला धक्काच बसला असे त्याच्या मामांनी पत्रकारांना सांगितले व त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला.>एका संशयास्पद प्रकरणातील तपासा साठी आम्ही नरेश ला ताब्यात घेतले होते.त्याची चौकशी केल्यानंतर आम्ही त्याला सोडून दिले.- विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर