राजावली खाडीपुलामुळेच पूर; वसई-विरार महापालिका जागी झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:23 IST2018-07-29T03:23:12+5:302018-07-29T03:23:24+5:30
जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे वसईत पूरपरिस्थीती निर्माण झाल्यामुळे त्याचे खापर महापालिकेच्या डोक्यावर फोडले गेले.

राजावली खाडीपुलामुळेच पूर; वसई-विरार महापालिका जागी झाली
नालासोपारा : जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे वसईत पूरपरिस्थीती निर्माण झाल्यामुळे त्याचे खापर महापालिकेच्या डोक्यावर फोडले गेले. मात्र, आता पंधरा दिवसात शोधतज्ञांकडून शहरात पूरपरिस्थीती बाबत आढावा घेतला असता नव्याने धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजीवली खाडीवरील तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या लोखंडी पूलासाठी खाडीपात्रात टाकलेला मातीचा भरावं व सिमेंट पाईपमूळे पाणी अडले. ते सकल भागात साचून वसई चार दिवस पाण्याखाली गेली असल्याचे समोर आले आहे. मात्र, हा पूल नेमका कुणी व कधी बांधला याबाबत प्रशासकीय नोंद नसल्यामुळे शासकीय यंत्रणेने मात्र आता हात वर केले आहेत.
मुसळधार पावसामुळे वसईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला. तब्बल १५० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत असताना मिठाआगरातील १२०० एकर जागेवरील हजारो टण तयार मीठ वाहून गेल्याने काट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पूर परिस्थीतीच्या मुळाशी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, राजावली खाडीपात्रातील अनिधकृत भराव कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. वसई पूर्व वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाजवळील राजावली खाडीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१४ साली नव्याने पूल बांधावयास घेतला. त्यावेळी या खाडीवर लाकडी सागाव पूल होता.
ही खाडी ४० फूट रूंद असून त्यात मातीचा भरावं टाकण्यात आला. मोठाले सिमेंट पाईप टाकून त्यावर तात्पुरता चार फुटाचा लोखंडी पूल उभारण्यात आला. मात्र त्यामूळे खाडीचे पात्र कमी होऊन ते १० फुटाचे झाले. त्यानंतर दरवर्षी या परिसरात काही प्रमाणात पूरपरिस्थीती निर्माण होऊ लागली. जुलै महिन्यातील पूरपरिस्थीती निर्माण होण्यास याच पूलाखालील मातीचा भराव कारणीभूत ठरला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाला हा तात्पुरता पूल व मातीचा भराव कोणी केला याची माहिती नाही.
याबाबत या परिसरात गेली काही वर्षे मीठ उत्पादन करणारे मनोज जोशी यांनी सांगितले की, ४ मार्च २०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला खाडीपात्रात माती भराव व पाईप टाकून लोखंडी पूल बनविण्यात येत असल्याचे कळवले होते. या भरावामूळे भरतीचे समुद्राचे पाणी येणे बंद झाल्यामुळे मीठ उत्पादनावर याचा परिणाम झाला होता. भविष्यात पूराचा धोका संभवेल अशी भीतीही पत्रव्यवहार करून कळवली होती. मात्र या अनिधकृत लोखंडी पुलावर वसई विरार महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
वसई चार दिवस पुराच्या पाण्याखाली गेल्यावर शिवसेनेचे शिष्टमंडळ पालिका आयुक्त सतिश लोखंडे यांना भेटले. त्यानंतर हा मातीचा भरावं व लोखंडी पूल काढण्यात आला. पुराच्या पाण्याचा निचरा त्यानंतरच झाल्याचा दावा शिवसेनेचे नवघर-माणकिपूर उपशहरप्रमूख मिलींद चव्हाण यांनी केला आहे. दोन वर्षांपासून तक्र ारी येत असतानाही प्रशासन गप्प का बसले. वेळीच कारवाई करणे अपेक्षित होत असे ही ते म्हणाले.
खाऱ्या पाण्याअभावी मिठागरे पडली ओस
नालासोपारा पूर्वेकडून पश्चिमेकडे या खाडीचा प्रवाह असून ती आचोळा-सोपारा खाडीला मिळते. तेथून ती वसई सुर्या गार्डन येथून वसई औद्योगिक वसाहतीमागून राजावली खाडीमार्गे नायगांव पूर्व खाडीत मिळाते. याच खाडीला पूर्वेकडून आलेला आणखीन एक मोठा नाला मिळतो. भरतीच्या वेळी नायगांव खाडीतून समुद्राचे पाणी वर चढत असते. त्यावर मिठागरात मीठ उत्पादक उत्पन्न घेतात. मात्र, गेल्या चार वर्षापासून भरतीच्या पाण्या आभावी मीठ बनवने शक्य होते नाही.
नव्याने बांधलेला पूल अपूर्णावस्थेत; आरोप-प्रत्यारोप सुरू
या खाडीवरील नव्याने बांधलेला पूल चैतन्य कंन्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. ३ कोटी १० लाख ७४२ रू.खर्चाचा हा पूल सध्या अपूर्णावस्थेत आहे. या मुख्य पूलाचे काम सुरू असतानाच सहारा समुहाने आपल्या नियोजित प्रकल्पासाठी लोखंडी पूल उभारला असा आरोप आता केला जात आहे. या परिसरात सहारा समुहाची मोठी जागा आहे. आता वसईकरांना पूरसंकटात ढकलणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरात पूरपरिस्थीती निर्माण होण्यास अनेक कारणे आहेत. त्यातील राजावली खाडीवरील पूल हे मुख्य कारण आहे. याबाबत माजी महापौर नारायण मानकर व विद्यमान उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर १४ जुलै रोजी खाडीपात्रातील मातीचा भरावं, पाईप व तात्पुरता उभारलेले लोखंडी पूल काढण्यात आला आहे.
- सतीश लोखंडे, वसई-विरार महापालिका आयुक्त
चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांच्यासोबत वसई औद्योगिक वसाहतीतील नुकसानीचा आढावा घेतला.१५० कोटी नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. राजावली खाडीकिनारी वसाहत असल्यामुळे याचा मोठा फटका या परिसराला बसला आहे. नायगांव येथील उड्डाणपूलाखालील ११, १२व १३ नंबर पिलरमुळेही गाडीतील पाणी वाहून जाऊ शकत नव्हते. अनिधकृत बांधकामे फक्त पालिक क्षेत्रात नाही तर वनविभाग व महसूल विभागातही झाली आहेत.
रूपेश जाधव , महापौर,
वसई-विरार महानगरपालिका