शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

पालघरमधील वाढलेले मतदार कुणापाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:11 AM

दीड लाखाची वाढ ठरणार निकाल फिरवणारी

- हितेन नाईकपालघर : पालघर लोकसभेच्या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात असून २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत ८.९ टक्क्यानी मतांच्या टक्क्यात म्हणजेच १ लाख ५४ हजार २२० मतांची वाढ झालेली असून या वाढलेल्या मतदार टक्क्यांचा फायदा नेमका कोण उठवणार यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.पालघर लोकसभेचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. ह्यात ७ उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असून ५ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. पालघर लोकसभेची २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एकूण १७ लाख ३१ हजार ७७ मतदार होते. तर आता झालेल्या नवीन मतदारांच्या नोंदणी नंतर १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांची नोंद झाल्याची माहिती निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे १ लाख ५४ हजार २२० नवीन मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे.२०१८ च्या पोट निवडणुकीत भाजप कडून राजेंद्र गावित (२ लाख ७२ हजार ७८२ मते), शिवसेनेचे श्रीनिवास वणगा यांना (२ लाख ४३ हजार २१० मते) तर बहुजन विकास आघाडी चे उमेदवार बळीराम जाधव यांना (२ लाख २२ हजार ८३८ मते) मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि सेना एकत्र लढत असून त्यांची मतांची बेरीज ५ लाख १५ हजार ९९२ इतकी भरत असून बविआ च्या उमेदवारा दरम्यान ची तफावत पाहता ती २ लाख ९३ हजार १५४ इतकी भरते. भाजप-शिवसेना महायुतीची पालघर,अर्धे बोईसर,डहाणू,विक्र मगड विधानसभेमध्ये मोठी ताकद असून २०१८ च्या पोट निवडणुकीत सेना-भाजप च्या दोन्ही उमेदवाराला एकूण ३ लाख ९७ हजार ९३२ मते मिळाली होती तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव ह्यांना अवघी ७९ हजार २२३ मते मिळाली होती.त्यामुळे ३ लाख १८ हजार ७४९ मतांचा मोठा फरक दोन्ही उमेदवारांच्या दरम्यान होता. बविआ चा बालेकिल्ला असणाऱ्या वसई व नालासोपारा या विधानसभा क्षेत्रात युतीच्या दोन्ही उमेदवारांना १ लाख १८ हजार ०५४ मते तर बविआ उमेदवाराला १ लाख ४३ हजार ६१२ मते पडली होती. यात फक्त २५ हजार ५५८ हजाराच्या मतांचा फरक असल्याचे दिसून येत आहे.८२ हजारांचा फरक युती-आघाडीची चुरसवर्ष २०१९ मध्ये नव्याने मतदान नोंदणी मध्ये वाढलेल्या १ लाख ५४ हजार २२० मतदारा पैकी १ लाख १९ हजार ४१७ एवढे मतदार हे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असलेल्या बोईसर, नालासोपारा व वसई या विधानसभा मतदार संघात वाढले असून पालघर, डहाणू आणि विक्र मगड या महायुतीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदार संघात फक्त ४८ हजार ८७४ नवीन मतदारांची वाढ झालेली आहे.त्यामुळे साधारण पणे ८२ हजार मतांचा फरक दोन्ही उमेदवारांमध्ये दिसून येत असल्याने हा फरक भरून काढण्यासाठी बविआ कामाला लागली आहे.तर जास्तीत जास्त मतदारांना महायुती कडे वळविण्या साठी महायुतीच्या मातब्बरांच्या प्रचार सभा सुरु आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरVotingमतदान