तीन उद्योग बंद तर 21वर दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:56 IST2019-11-16T00:56:31+5:302019-11-16T00:56:38+5:30
तारापूर एमआयडीसीमधील दोन मोठे कापड तसेच एका रासायनिक उद्योगावर बंदची तर सुमारे २१ उद्योगांवर दंडात्मक रक्कमेची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली आहे.

तीन उद्योग बंद तर 21वर दंडात्मक कारवाई
पंकज राऊत
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील दोन मोठे कापड तसेच एका रासायनिक उद्योगावर बंदची तर सुमारे २१ उद्योगांवर दंडात्मक रक्कमेची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली आहे. काही प्रमाणात झालेल्या आणि सध्या सुरु असलेल्या विशेष पथकाचा पाहणी तसेच तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक उद्योगांवर कारवाई होण्याची टांगती तलवार असल्याने बहुसंख्य उद्योगांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, १३ आणि १४ नोव्हेंबरला राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये पाच जणांच्या विशेष समितीनेही तारापूरच्या प्रदूषणासंदर्भात पाहणी दौरा केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्लोबल या रासायनिक कारखान्यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तर मंधना डार्इंग व पाल फॅशन लि. या कपडा उद्योगावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे बंदची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य २१ उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मापदंड न पाळल्याने दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाच्या अनुषंगाने म.प्र.नियंत्रण मंडळाने बजावलेल्या आहेत.
या कारखान्यांमधून सांडपाणी सोडणे गरजेचे होते, ते न सोडल्याने प्रदूषणाची हानी झाली. पर्यायाने पर्यावरणाचा ºहास केला म्हणून या नोटिसा बजावल्या आहेत. यात मोठ्या उद्योगांना एक कोटी, मध्यम ५० लाख तर लघु उद्योगांना २५ लाख रुपये रकमेच्या दंडाचा समावेश आहे. दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाच्या (एन.जी.टी.) आदेशान्वये आय.आय.टी. (मुंबई) आय.आय.एम (अहमदाबाद) व निरी अशा उच्च दर्जाच्या (टेक्निकल टीम) समितीच्या सदस्यांनी केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बुधवार आणि गुरुवार (दि.१३ व १४) अशी सलग दोन दिवस तारापूर औद्योगिक क्षेत्रातील २५ एम.एल.डी. क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र (सी.ई.टी.पी.) नवापूर, दांडी, उच्छेळी येथील खाडी किनारा तसेच परिसरातील कूपनलिका (बोअरवेल) नाले इत्यादींची पाहणी केली.
एन.जी.टी.च्या आदेशान्वये ही समिती प्रथमच तारापूरला आली होती. या टीमने स्वतंत्रपणे पाहणी करावी, असे निर्देश असल्याने त्या समितीने अखिल भारतीय मांगेला समाज या याचिकाकर्त्यांनाही बरोबर घेतले नाही. मात्र पुढील पाहणी दौºयाच्यावेळी अ.भा.मांगेला समाजाच्या प्रतिनिधींना बरोबर घेण्यात यावे, अशी अपेक्षा याचिकाकर्ते व माजी सरचिटणीस नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. तारापूर औद्योगिक क्षेत्रातून प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचा किनारपट्टी, शेतजमीन आणि नागरिकांवर गंभीर परिणाम होतो.
>दिवाळीनंतर दुसºया टप्प्यातील तपासणी
अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे चार वर्षांपूर्वी याचिका दाखल केल्यानंतर अनेक सुनावण्यांदरम्यान लवादाने दिलेले विविध आदेश व सप्टेंबरमध्ये दिलेल्या निर्णयानंतर विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाने तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील लाल व नारिंगी अशा सुमारे ६०० उद्योगांमधील रासायनिक सांडपाणी व हवा प्रदूषणासंदर्भात विशेष तपासणी मोहिमेचा (सर्वेक्षण) >पहिला टप्पा
९ सप्टेंबरपासून सुरु केला होता.पहिल्या टप्प्यात सुमारे २०० उद्योगांमध्ये तपासणी मोहीम राबविली तर उर्वरीत तपासणी दुसºया टप्प्यात दिवाळीनंतर सुरु केली असून त्यामध्ये आठ टीम कार्यरत असून या दोन्ही टप्प्यांचा तपासणी अहवाल अजून प्रलंबित आहे, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती करवाई करण्यात येणार आहे.