पालघरमध्ये ‘हाथरस’च्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:08 AM2020-10-03T00:08:18+5:302020-10-03T00:09:09+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.

Protests against 'Hathras' in Palghar | पालघरमध्ये ‘हाथरस’च्या निषेधार्थ निदर्शने

पालघरमध्ये ‘हाथरस’च्या निषेधार्थ निदर्शने

Next

पालघर/जव्हार : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असून या घटनेचा देशभर संताप व्यक्त होऊ लागला आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. जव्हारमध्ये हाथरस प्रकरणातील पीडितेला न्याय तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने जव्हार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्कीच्या निषेधार्थ जव्हार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष फारूक मुल्ला, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संदीप मुकणे, जिल्हा सरचिटणीस भरत बेंद्रे, जिल्हा चिटणीस मोहसीन लुलानीय यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांचा प्रतीकात्मक पुतळा ही जाळण्यात आला. काँग्रेस कार्यकत्यांनी मोदी व योगी सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस प्रदीप राका, प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्ठे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रुफी भुरे, मधुकर चौधरी, जिल्हा कार्याध्यक्षा शरयूताई औसरकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश मुकणे, बळवंत गावित आदी उपस्थित होते.

शेतकरीविरोधी विधेयकाचाही निषेध
च्केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकार यांच्या मनमानी, तानाशाही व दंडेलशाहीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलने छेडण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जव्हार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

च्केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयक पारित केल्यामुळे भाजप सरकारविरोधात जव्हार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक येथे शुक्रवारी आंदोलन करून जव्हार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तलासरी : उत्तर प्रदेशमध्ये १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. याचा निषेध म्हणून तलासरी नाका येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.

निदर्शकांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करून बलात्कारी नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

तलासरी पंचायत समिती सभापती नंदकुमार हाडळ, उपसभापती राजेश खरपडे, नगरसेवक सुहास सुरती, सुरेश भोये, जिल्हा परिषद सदस्य अनिल झरिवा, अक्षय दवणेकर, पं.स. सदस्य शरद उंबरसाडा, गणपत वनगा, नरेश शिंगाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Protests against 'Hathras' in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app