शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

स्थानिक शिक्षकांना प्राधान्य, अनेक आंदोलनांना अखेर आले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 02:18 IST

जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे.

हितेन नाईक पालघर : जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे. पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रि या पार पडल्याने पालघर जिल्हा परिषदेने एक वेगळा आदर्श पायंडा पाडला आहे.जिल्हा परिषदेच्या ८ वी इयत्तेपर्यंतच्याच शाळा असूूून ८ वी उत्तीर्ण होऊन गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना इतर शाळेत अतिरिक्त तुकड्या उपलब्ध नसल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची दाट शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने शाळांतील ९ वी व १० वी च्या अतिरिक्त तुकड्याना मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे जिल्हा परिषद शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांना धाडला होता. हे अतिरिक्त विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता अखेर शालेय शिक्षण विभागाने ३१ जुलै २०१५ ला त्यास मान्यता दिली. या अंतर्गत जिल्ह्यातील ६० शाळांचा तुकडी वाढीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३९ शाळांतील या तुकड्यांसाठी तात्पुरत्या ११४ शिक्षक भरतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शेष फंडातून मंजूर केला. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी), वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचा समावेश असलेली निवड समिती स्थापन करण्यात आली आणि शिक्षण विभागाकडून वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. याअंतर्गत उमेदवारांनी अध्यापक शिक्षण केलेल्या विद्यापीठातून मिळविलेल्या गुणांकानुसार त्यांची पात्रता ठरविण्यात आली. विशेष बाब म्हणजे यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले असून यात त्यांना २० अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत.या शिक्षक भरतीसाठी जि. प.शिक्षण विभागाने विज्ञान, गणित व इंग्रजी विषयासाठी शिकविणाºया उमेदवारांचे अर्ज १२ ते १९ जुलै २०१८ पर्यंत मागविले. यामध्ये ४५६ अर्ज प्राप्त झाले. २० ते २४ जुलै पर्यंत आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर २५ जुलै रोजी तात्पुरत्या पात्र उमेदवारांच्या याद्या घोषित करण्यात आल्या. यानंतर अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या. यामध्ये ३१ उमेदवारांनी हरकती घेतल्या. त्याची शहानिशा करून काही मान्य करण्यात आल्या व त्या वेबसाईट वर अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड करण्यात आल्या.>नियुक्ती नऊ महिन्यांसाठी मासिक मानधन आठ हजार रुपयेजिल्ह्यात शिक्षकांची ११४ पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे कारण देऊन आंदोलन करून शाळेला टाळे ठोकण्याचे प्रकार वाढीस लागले होते. शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत ह्यासाठी शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव गेला आहे. जि.प.ने स्वत:च्या शेष फंडातून निधीची व्यवस्था करून ७५ पदे भरण्यात यश मिळविले आहे. ९ महिन्यांसाठी ८ हजार रु पये मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरीत ३९ पदे टप्प्या टप्प्याने भरली जातील. शिक्षण विभागाकडील रिक्त जागांचा प्रश्न सुटल्यास ९ महिन्यानंतर या नियुक्त्या आपोआपच बरखास्त होतील. मात्र शासनस्तरावर हा प्रश्न ताटकळत राहिल्यास या ७५ शिक्षकांना पुढची मुदतवाढ मिळू शकते.>स्थानिकांना प्राधान्य देताना गुणवान शिक्षक मिळावेत म्हणून पारदर्शक निवड केली आहे. -राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारीस्थानिकांचा त्यांचा अधिकार मिळवून देणारी व त्यांना न्याय देणारी ही भरती आहे. - हरेश गावित,सायवन जि. प.शाळा डहाणू

टॅग्स :Teacherशिक्षक