शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:23 PM

पालघरमध्ये मनसे आक्र मक : संगणक प्रशिक्षकांची परीक्षा उधळून लावण्याचा मनसेकडून प्रयत्न

पालघर : कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर ९ वर्षे काम करणाऱ्या स्थानिक संगणक प्रशिक्षकांना सामावून न घेता पुन्हा परीक्षा प्रक्रिया राबवून जिल्ह्याबाहेरील प्रशिक्षक भरण्याचा प्रयत्न होत असल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी परीक्षा केंद्रावर जात जोरदार आंदोलन केले. ही परीक्षा प्रक्रिया हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी त्यांना अटक केली.

शासकीय आश्रमशाळा संगणक प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित संगणक प्रशिक्षण देण्यासाठी संगणक प्रशिक्षक म्हणून अनुसूचित जमातीच्या २७ स्थानिक तरुणांची निवड झाली. एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू, जव्हारच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या वतीने कंत्राटी पद्धतीवर निवडलेल्या या २७ जणांना ४ हजार इतके अल्प मानधन दिले होते. २००९-१० च्या शासकीय परिपत्रकान्वये कुठल्याही शाखेची तत्सम पदवी आणि त्याला संलग्न असा असा संगणकाचा कुठलाही अभ्यासक्रम पूर्ण केला असेल अशा उमेदवाराची निवड करण्याची अट होती. शासनाच्या बदलत्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणाºयांना शासन कायम करण्याचा विचार करत असल्याचे आश्वासन निवडणुकांच्या तोंडावर मिळाले होते. यावर विश्वास ठेवत २७ स्थानिक प्रशिक्षक अत्यंत अल्प अशा मानधनावर ९ वर्षे काम करीत होते. या कंत्राटी ठेक्यात भ्रष्टाचार झाल्याचे कारण देत हा ठेका २०१८ साली रद्द करण्यात आला होता.

दरम्यान, संगणक प्रशिक्षकाची नेमणूक करताना २७ प्रशिक्षकांना पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी हे प्रशिक्षक वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करीत होते. त्यामुळेच शासनाला पुन्हा कंत्राटी पद्धतीने प्रशिक्षक भरतीचे आदेश काढावे लागल्याचा दावा निलेश कासट या आंदोलनकर्त्या प्रशिक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना केला.

शासनाने संगणक प्रशिक्षक भरती परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करताना तत्सम पदवी सोबत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) आणि (बीसीए) बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अशा पदव्यांच्या शैक्षणिक पात्रतेची अट घातली. या अटी मध्ये २७ स्थानिक प्रशिक्षक बसत नसल्याने ते आपोआप या प्रक्रियेतून बाद ठरणार होते. आपण आमची नियुक्ती करावी. त्या दरम्यान आम्ही कॉम्पुटरच्या दोन्ही पदव्या प्राप्त करू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु त्यांच्या विनंतीचा साधक-बाधक विचार न करता पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात रविवारी संगणक, निर्देशक यांच्या ५७ पदांसाठी पालघरसह नंदुरबार, बुलढाणा, धुळे, वर्धा, अमरावती येथील ४७५ उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित राहिले होते. या विरोधात उभारलेल्या या लढ्याला बळ देण्यासाठी मनसेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शेकडो सैनिक उपस्थित होते.मनसेचे शेकडो कार्यकर्तेया २७ स्थानिक प्रशिक्षकांना प्रथम प्राधान्य द्या अशी मागणी करीत मनसेने परीक्षा केंद्रावर जोरदार निदर्शने केली. पालघर पोलिसांनी मनसेचे तालुकाध्यक्ष धीरज गावड, शहराध्यक्ष सुनील राऊत, दिनेश गवई, उदय माने, मंगेश घरत, गोपाळ वझरे, उमेश गोवारी, सुनील इभान, विशाल जाधव, नीलीम संखे, जालीम तडवी, विजय गांगुर्डे, नित्यानंद पाटील यांना अटक करत त्यांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले. या विरोधात उभारलेल्या या लढ्याला बळ देण्यासाठी मनसेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शेकडो सैनिक उपस्थित होते.