शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

प्रशांत राऊत स्थायीचे तर प्रीतेश पाटील परिवहनचे सभापती; सत्ताधारी तसेच विरोधकांकडून अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:29 PM

वसई - विरार महापालिकेच्या स्थायी तसेच परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी पालिका सभागृहात पार पडली. या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या.

वसई : वसई - विरार महापालिकेच्या स्थायी तसेच परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी पालिका सभागृहात पार पडली. या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या. स्थायी समिती सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे विरार मनवेलपाडा येथील ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत राऊत यांची तर परिवहन सभापतीपदी प्रीतेश पाटील यांची फेरनिवड झाली आहे.महापालिकेची अत्यंत महत्त्वाची समिती असलेल्या स्थायी समिती सभापतींची निवडणूक बुधवारी सकाळी मुंबईचे जिल्हाधिकारी (उपनगर) आणि पिठासीन अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या पदासाठी बविआकडून नगरसेवक प्रशांत राऊत यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. आ. हितेंद्र ठाकूर यांनी सोपविलेल्या जबाबदारीला माझा पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रशांत राऊत यांनी यावेळी सांगितले.बविआचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच नगरसेवक उपस्थितवसई : वसई - विरार महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती पदासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी अणि मुंबई जिल्हाधिकारी (उपनगर) मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पालिका सभागृहात पार पडली. यावेळी एकमेव अर्ज दाखल करणारे बविआचे उमेदवार प्रीतेश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी घोषित केले.दरम्यान, सोमवार, १९ आॅगस्ट रोजी दुपारपर्यंत सत्ताधारी बविआकडून एकच नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते.यावेळी नवनिर्वाचित सभापती प्रीतेश पाटील यांची फेरिनवड झाल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार