व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ताब्यात

By Admin | Updated: April 13, 2017 02:36 IST2017-04-13T02:36:56+5:302017-04-13T02:36:56+5:30

जेष्ठ काँग्रेस नेते आणि महापुरु षांचे चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट आॅट्सअ‍ॅप्पवर टाकणाऱ्या पालघरमधील ग्रुप एडमिंन आणि त्याच्या साथीदारा विरोधात पालघर तालुका

Possession of offensive posts on WhatsAppApps | व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ताब्यात

व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ताब्यात

पालघर : जेष्ठ काँग्रेस नेते आणि महापुरु षांचे चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट आॅट्सअ‍ॅप्पवर टाकणाऱ्या पालघरमधील ग्रुप एडमिंन आणि त्याच्या साथीदारा विरोधात पालघर तालुका काँग्रेस कमिटीने तक्र ार दाखल केल्या नंतर पालघर पोलिसांनी त्या तरु णांना ताब्यात घेतले आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांच्या बद्दल चुकीची माहिती आणि बदनामी करणाऱ्या पोस्ट पालघर मधील काही तरुणांच्या मोबाईल वरील ‘पालघर प्रहार’ ह्या ग्रुप वर फिरत होत्या. पालघरच्या गांधी नगरमध्ये राहणारा ग्रुप एडमिंन आयुब पठाण आणि कुणाल माने नामक माथेफिरु तरु णानी चारित्र्य हनन करणारी पोस्ट टाकून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रवत्तीना आळा घालता यावा ह्यासाठी दोन्ही तरु णांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, शैलेश ठाकूर, निलेश राऊत, भावानंद संखे, प्रकाश पटनाईक, सुनील इंगोले, शमीम शेख, दुर्वेश कंसारा, चिराग देसाई, शैला प्रसाद, संध्या बागुल आदींनी पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हजारे ह्यांच्या कडे केली. (वार्ताहर)


हा तर दहशतवाद...
निवडणूका आल्या की, क्रिएटिव्ह मेसेज हेतू पुरस्सर पसरवले जातात. त्यातुन तरुणांची माथी भडकविण्याचे प्रकार होत असल्याने हा वैचारिक दहशतवाद थांबविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: Possession of offensive posts on WhatsAppApps