सोशल मीडियावरची मैत्री महागात, महिलेने मागितली तरुणाकडे खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 00:14 IST2021-03-12T00:13:38+5:302021-03-12T00:14:09+5:30
अश्लील व्हिडीओ प्रकरण : महिलेने मागितली तरुणाकडे खंडणी

सोशल मीडियावरची मैत्री महागात, महिलेने मागितली तरुणाकडे खंडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : पूर्व परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणासोबत सोशल मीडियाद्वारे मैत्री करून व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडीओ बनवून तो मित्रांना पाठवून देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा बुधवारी दाखल झाला आहे.
नालासोपाऱ्याच्या तुळिंज रोडवरील साईधाम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या गौरवसिंग राजपुरोहित (२४) याच्या मोबाइलवर ६ ते ८ मार्चदरम्यान पैशांची मागणी करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील महिला आरोपी नेहा शर्मा हिने गौरवसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली. नंतर त्याचा मोबाइल नंबर मिळवून व्हॉट्सॲपवर बोलून व्हिडिओ सेक्सची मागणी केली. आरोपी महिला ऐकत नसल्याने त्याने मान्य केले. तो अश्लील व्हिडीओ तयार करून आरोपीने त्याच्या मित्रांना पाठवून देईन, अशी धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्याने नकार दिल्यावर अश्लील व्हिडीओ आरोपीने त्याच्या मित्रांना पाठवून दिला. पीडित तरुणाने बुधवारी तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करून तो तपासासाठी सायबर सेलला पाठवणार असल्याचे तुळिंजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ज्यांना ओळखत नाही, त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट तरुण पिढीने स्वीकारू नये, जेणेकरून फसवणूक होणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.