शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तासाठी वसईतील पोलीस सज्ज, नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये यासाठी कायद्याचे रक्षक दक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 11:33 IST

Vasai : या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. 

नालासोपारा : जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर वसई तालुक्याच्या हद्दीमधील नऊही पोलीस ठाण्याचे पोलीस सज्ज झाले आहेत. अपघात होऊ नये, दारू पिऊन गाडी चालवू नये, ड्रग्स पिणाऱ्यांना पकडण्यासाठी, रेव्ह पार्टी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची पथके तयार करण्यात आली आहेत. या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. सर्वत्र नवीन वर्षांचे सेलिब्रेशन होते; पण मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात होते. सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, चायनीज दुकाने, केक शॉप, बीअर शॉप, वाईन्स शॉप यांना रंगोरगोटी करून उत्तम रोषणाई करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यासाठी पथके तयार केली आहेत. तालुक्यातील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टवाल्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यात दिलेल्या अटी व नियमांचे पालन न झाल्यास हॉटेल व रिसॉर्ट मालकावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे नमूद केलेले आहे.घरी आणि इमारतींच्या गच्चीवर होणाऱ्या नववर्षाच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. जर पार्टीमध्ये मद्य घेतले जाणार नसेल तर परवानगी घेण्याची गरज नाही, पण जर मद्य घेतले जाणार असेल तर परवानगी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर बार, धाबे, महामार्गावरील हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अबकारी विभागाने ख्रिसमस आणि वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व द्रूतगती मार्ग, मुंबई-अहमदाबाद आणि अन्य हॉटेल्सवर नियमितपणे तपासणी सुरू केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

वसईत अनेक पोलीस पथके तयार केलेली आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह च्या केसेस करण्यासाठी मुख्य नाक्यावर नाकाबंदी केली जाणार आहे. रेव्ह पार्टी होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. - संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, झोन-२, वसई विरार

३१ डिसेंबरच्या रात्री रस्त्यावर, समुद्रकिनारी, हॉटेल, रिसॉर्ट येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसई-विरार पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. - प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त, झोन-३, वसई विरार

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार