राज पुरोहितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 03:04 IST2015-07-20T03:04:31+5:302015-07-20T03:04:31+5:30

कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज पुरोहित यांच्याविरोधात जातीवाचक विधान करून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार येथील नागरिक

Police Complaint against Raj Purohits | राज पुरोहितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

राज पुरोहितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

डोंबिवली : कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज पुरोहित यांच्याविरोधात जातीवाचक विधान करून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार येथील नागरिक आशीष जोशी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
पुरोहित यांनी भाजपाच्या विविध नेत्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधाने करून ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींविरुद्ध अपमानकारक विधाने केली आहेत. संबंधित क्लिप प्रसारमाध्यमांवर दाखविण्यात आली तसेच इंटरनेटवरदेखील उपलब्ध आहे. पुरोहितांनी अशी विधाने करून एक प्रकारे जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजातील व्यक्तींच्या मनाला ठेच पोहोचविल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या वादग्रस्त विधानांमुळे ब्राह्मण समाजाची प्रतिमा मलीन झाली आहे. यामुळे अन्य समाजांमध्ये याचा वापर होऊन तेढ निर्माण होण्याची शक्यता असून शांतता व सुव्यवस्था बिघडविली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर संबंधित तक्रारीत पुरोहित यांनी हे विधान कुठे केले, यासंदर्भातल्या ठिकाणाचा उल्लेख नाही. तरीदेखील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करू, असे लेखी आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी जोशी यांना दिले आहे. या प्रकरणात आपण न्यायालयातदेखील दाद मागणार असल्याचे जोशी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Police Complaint against Raj Purohits