शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून प्रसिद्ध करण्यास पोलिसांची बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 22:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड- मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो - व्हिडीओ काढून प्रसारित ...

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो - व्हिडीओ काढून प्रसारित करण्यास बंदी आणली आहे. शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशा नुसार यंदा ६ फूट पर्यंतच्या मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. तर ६ फूट पेक्षा उंच मुर्त्यांची नैसर्गिक जलस्रोत मध्ये विसर्जन केल्यावर त्या पुन्हा काढून घेण्याचे आदेश आहेत. 

कृत्रिम तलावाची उभारणी, मुर्त्यांची हाताळणी, त्या संरक्षित व मनुष्य प्रतिबंधित भागात ठेवणे, त्याची वाहतूक व पुढील नियोजन देखील गोपनीय पद्धतीने आवश्यक असते. मात्र कृत्रिम तलाव व व्यवस्थेवरून काहींनी फोटो - व्हिडीओ काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. तेढ - तणाव निर्माण करण्यासह लोकांच्या धर्मी भावना दुखावणे, भडकावणे व चिथावणी देण्याचा प्रयत्न करणे सुरु होते. त्यातून सार्वजनिक सुरक्षितता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती. 

त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाने २ सप्टेंबर रोजी मनाई आदेश जारी केला आहे. उपायुक्त मुख्यालय अशोक वीरकर यांनी जारी केलेल्या आदेशा नुसार, काही अर्ध्या विरघळलेल्या मुर्ती किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात अश्या मुर्तीचे फोटो घेतात. महानगरपालिकेचे कर्मचारी मुर्ती गोळा करतानांचे फोटो घेतात आणि धार्मिक भावना दुखावतील आणि सार्वजनिक शांतता आणि भावना दुखावतील अशी छायाचित्रे किंवा चलचित्र प्रकाशित, प्रसारित करतात.

ते प्रतिबंधित करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर तरंगत्या मुर्तीचे किंवा अर्धवट तरंगत्या मुर्तीचे फोटो काढू नयेत आणि ते प्रकाशित किंवा प्रसारित करु नये असे बजावले आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे. हा आदेश दि. १४ सप्टेंबर पर्यंत मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये लागू राहील.आदेशामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे असे स्पष्ट केले आहे. 

मुंबईत विसर्जित केलेल्या गणेश मुर्त्या ह्या समुद्र किनारी पुन्हा वाहून येतात. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्तालय गेली अनेक वर्षे अश्या प्रकारची बंदी आणत असते.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी